दोघांच्या नेत्रदानाने 4 दृष्टीहिनांच्या आयुष्यात प्रकाश

By admin | Published: May 22, 2014 08:45 AM2014-05-22T08:45:12+5:302014-05-22T19:50:41+5:30

दोन वृद्धांनी केलेल्या नेत्रदानामुळे चार दृष्टीबाधितांच्या आयुष्यातील काळोख दूर होणार आहे.

Light of the eyes of the eyes of both eyes | दोघांच्या नेत्रदानाने 4 दृष्टीहिनांच्या आयुष्यात प्रकाश

दोघांच्या नेत्रदानाने 4 दृष्टीहिनांच्या आयुष्यात प्रकाश

Next

अकोला : दोन वृद्धांनी केलेल्या नेत्रदानामुळे चार दृष्टीबाधितांच्या आयुष्यातील काळोख दूर होणार आहे. नेत्रदान व नेत्ररोपण संशोधन केंद्र व नेत्र कमलांजली चॅरिटेबल हॉस्पिटलच्या माध्यमातून दोन वृद्धांचे १५ मे रोजी नेत्रदान करण्यात आले.
सिंधी कॅम्प परिसरात राहणारे राकेश केसवानी यांचे वडील जसवंत केसवानी (६५) यांचे निधन झाले. अनिल कावणा, गौतम वाधवानी, अमर सबलानी, हरीश रोहडा यांच्या पुढाकाराने जसवंत केसवानी यांचे कमलांजली हॉस्पिटलमध्ये नेत्रदान करण्यात आले. तसेच केशवनगरातील वसंतराव नगरनाईक यांच्या मातोश्री प्रमिलाबाई नगरनाईक (९0) यांचे २0 मे रोजी निधन झाले. डॉ. राजू देशपांडे यांच्या पुढाकाराने प्रमिलाबाई नगरनाईक यांचे मरणोपरांत नेत्रदान करण्यात आले. या दोघाही वृद्धांच्या नेत्रदानामुळे चार दृष्टीबाधितांच्या आयुष्यात प्रकाश पसरणार आहे. या कार्यासाठी नेत्रदान संस्थेचे नेत्रतज्ज्ञ डॉ. सरजू उनडकाट, नेत्रचिकित्सा तंत्रज्ञ डॉ. श्याम पनपालिया यांच्यासह डॉ. चंद्रकांत पनपालिया, राकेश केसवानी, हिरानंद मुलानी, संतोष मुलानी, नीलेश वाधवानी, विनोद नगरनाईक, विलास नगरनाईक, वेद पनपालिया, ज्योती रामटेके यांचे सहकार्य लाभले.

Web Title: Light of the eyes of the eyes of both eyes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.