विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा
By admin | Published: August 13, 2015 10:49 PM2015-08-13T22:49:04+5:302015-08-13T22:49:04+5:30
राज्यात विदर्भात सर्वाधिक सिंदेवाई, नागभीडला १५ से.मी. पावसाची नोंद.
अकोला : विदर्भात येत्या ३६ तासांत तुरळक ठिकाणी जोरदार व मुसळधार पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. मागील २४ तासांत राज्यात सर्वाधिक पाऊस विदर्भातील सिंदेवाई व नागभीड येथे १५ सें.मी. नोंदविण्यात आला आहे. सध्या उत्तर आंध्र प्रदेश आणि लगतच्या ओडिशावर असलेले कमी दाबाचे क्षेत्र आता आग्नेय मध्य प्रदेश आणि लगतच्या विदर्भ व दक्षिण छत्तीसगडवर आहे. त्यामुळे विदर्भात पावसाचा जोर कायम आहे. मागील चोवीस तासांत विदर्भातील सिंदेवाई व नागभीड येथे १५ सें.मी. पावसाची नोंद झाली आहे. तसेच चिमूर, गोडपिंपरी, मौदा येथे १२ सें.मी. पाऊस झाला आहे. भिवपूर, पौनी, कुही येथे ११ सें.मी., कामठी, मूल येथे १0 सें.मी., अर्जुना, मोरगाव, सावली, उमरेड ८ सें.मी., भंडारा, चंद्रपूर, नागपूर, सालेकसा येथे ७ सें.मी., ब्रह्मपुरी, देवळी, मोहाडी, राजुरा येथे ६ सें.मी., भद्रावती, जळगाव जामोद, पोम्भूर्णा, साकोली, संग्रामपूर येथे ५ सें.मी. हिंगणा, लाखणी, सडकअर्जुनी, समुद्रपूर, तुमसर, वरोरा येथे ४ सें.मी. , अकोला, अमरावती, बाश्री, हिंगणघाट, कळमेश्वर, कोपर्णा, मारेगाव, पांढरकवडा, पेरसेवणी, सावनेर, तिरोरा, वणी, वर्धा, वरूड, झरीझामणी येथे ३ सें.मी., आमगाव, आर्णी, देवळी, गोंदिया, गोरेगाव, नोईली, नांदगाव काजी व राळेगाव येथे २ सें.मी. तसेच बाळापूर, चिखलदरा, चिखली, धामणगाव, घाटंजी, कळंब, लोणार, महागाव, नेर, पुसद, शेगाव, वाशिम व यवतमाळ येथे १ सें.मी. पाऊस झाला आहे. तसेच कोकण - गोवा, मराठवाड्यात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. १५ ऑगस्ट रोजी राज्यात तुरळक ठिकाणी, तर १६ व १७ ऑगस्ट रोजी कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पुणे परिसरात १४ ते १९ ऑगस्टपर्यंत अधून-मधून पावसाच्या सरी कोसळतील. मुंबई व परिसरात १४ व १५ ऑगस्ट रोजी पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे.