मध्यप्रदेशच्या धर्तीवर राज्यातही कन्यादान योजना लागू करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2018 03:39 PM2018-07-29T15:39:08+5:302018-07-29T15:40:18+5:30
अकोट : मध्यप्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यामध्येही अनुसुचित जाती (एससी) मुलींसाठी मातोश्री रमाबाई आंबेडकर कन्यादान योजना सुरू करण्याची मागणी आकोट येथील रेनबो सामाजीक संस्थेने एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
अकोट : मध्यप्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यामध्येही अनुसुचित जाती (एससी) मुलींसाठी मातोश्री रमाबाई आंबेडकर कन्यादान योजना सुरू करण्याची मागणी आकोट येथील रेनबो सामाजीक संस्थेने एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
महाराष्ट्र राज्य हे संपुर्ण देशात सर्वच बाबतीत आघाडीवर असलेले राज्य म्हणून ओळखले जाते. फुले, शाहु, आंबेडकरांचा वारसा या राज्याने जोपासला, जातीय सलोखा कायम राखण्यात महाराष्ट्र राज्य अग्रणी आहे. भारतीय संस्कृती नुसार मुलींचा विवाह संस्कार हा जीवनातील अतिशय महत्वाचा टप्पा असून कुठलाही माय किंवा बाप असणारा व्यक्ती आपल्या मुलीचा विवाह आपण चांगल्या पध्दतीने पार पाडू हे स्वप्न उराशी बाळगुन असतो. परंतू आर्थिक विवंचनेत असलेल्या माय किंवा बापाला मुलीचे लग्न जणू काही डोईवरचे ओझे वाटू लागते. अडचणीच्या वेळी माय किंवा बाप प्रसंगी कजार्ची उभारणी करून मुलीचे लग्न करतात. आणि उभारलेले कर्ज हे खाजगी सावकारांचे अतिशय जास्त व्याज आकारणीचे आणि प्रसंगी आयुष्यभर या कजार्ची फेड करणे शक्य नसल्याने हे कर्ज असते. यातूनच आत्महत्येचा विचार संकटात असलेल्या व्यक्तिला येतो. एकिकडे शेतीपासून मिळणारे उत्पन्न हे अतिशय तोकडे असून पिकांवर झालेला खर्च हा सुध्दा कधी कधी निघणे कठिण असते. अशा प्रकारे नैराश्याने ग्रासलेल्या व्यक्तिला सामाजिक दायित्व म्हणून महाराष्ट्र राज्य सरकारने मध्यप्रदेश राज्यात सुरू असलेल्या कन्यादान योजनेच्या धर्तीवर आपल्या राज्यात सुध्दा अनुसुचित जाती साठी (एससी) मातोश्री रमाबाई आंबेडकर कन्यादान योजना सुरू करावी. या योजनेअंतर्गत एक लाख रुपयांची आर्थिक मदत मुलीच्या बँक खात्यात जमा करावी, अशी मागणी रेनबो सामाजीक संस्थेचे अध्यक्ष संजय तेलगोटे यांच्यासह डॉ. मिलींद थोरात, डॉ. प्रा. रवि जुमळे, डॉ. प्रा. विलास तायडे, अॅड. राजेश वानखडे, डॉ. रवी राउत व संजय इंगळे यांनी केली आहे.