अकोल्यात सणासुदीत जिल्ह्यात दारूचा महापूर, सहा विक्रेते ताब्यात
By सचिन राऊत | Published: September 17, 2023 04:20 PM2023-09-17T16:20:15+5:302023-09-17T16:20:49+5:30
विविध पाेलिस ठाण्याच्या हद्दीत छापेमारी केली़ या छापेमारीत सहा जणांना ताब्यात घेउन त्यांच्याकडून तीन लाख रुपयांचा दारुसाठा जप्त करण्यात आला आहे़.
अकाेला : सन उत्सवाच्या पार्श्वभुमीवर जिल्हयात देशी व विदेशी दारुची अवैधरीत्या वाहतुक व विक्री सुरु असल्याच्या माहीतीवरुन स्थानीक गुन्हे शाखेच्या पथकाने रामदास पेठ, खदान, पातूर अशा विविध पाेलिस ठाण्याच्या हद्दीत छापेमारी केली़ या छापेमारीत सहा जणांना ताब्यात घेउन त्यांच्याकडून तीन लाख रुपयांचा दारुसाठा जप्त करण्यात आला आहे़ खदान पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील मलकापूर परिसरात नाजुकराव काकड रा़ अंबीका नगर यास ताब्यात घेउन त्याच्याकडून चार हजार रुपयांचा दारुसाठा जप्त करण्यात आला आहे़
रामदास पेठ पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील तारफैल परिसरात करण गवळी रा़ भीमचाैक अकाेट फाइल यास ताब्यात घेउन त्याच्याकडून देशी व विदेशी दारुच्या साठयासह ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्यानंतर मालधक्का परिसरात छापा टाकून नरेश श्रीकृष्ण तेलगाेटे यास ताब्यात घेउन त्याच्याकडून त्याच्याकडून ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे़ खदान पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील खडकी परिसरात मराठा हाॅटेलमधील प्रशांत उध्दव साेनाेने रा़ धाबेकर नगर यास ताब्यात घेउन त्याच्या हाॅटेलमधून ४ हजार रुपयांचा दारुसाठा जप्त केला़ त्यानंतर पातूर पाेलिस ठाण्याच्या हद्दीत चिखलगाव येथे नंदकीशाेर उर्फ नंदु सुभाष बरगे यास ताब्यात घेउन त्याच्याकडून ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे़ तसेच वाडेगाव परिसरात बेलूरा येथील रहीवासी दिनेश देवालाल डाबेराव हा देशी व विदेशी दारुची अवैधरीत्या विक्री करीत असतांना त्याला ताब्यात घेउन देशी व विदेशी दारुसह साठा जप्त करण्यात आला़
स्थानीक गुन्हे शाखेने विविध ठिकाणी छापेमारी करीत सहा जणांना ताब्यात घेउन तीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे़ ही कारवाइ पाेलिस अधीक्षक संदिप घुगे, अपर पाेलिस अधीक्षक अभय डाेंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानीक गुन्हे शाखेचे प्रमूख शंकर शेळके, कैलास भगत, गाेपीलाल मावळे, राजपालिसंह ठाकूर, फीराेज खान, भास्कर धाेत्रे, प्रमाेद डाेइफाेडे, उमेश पराये, गाेकुळ चव्हाण, रवि खंडारे, विशाल माेरे, अविनाश पाचपाेर, महेंद्र मलीये, खुशाल नेमाडे, अब्दुल माजीद, आकाश मानकर, धीरज वानखडे, अभीषेक पाठक, माेहम्मद आमीर, अन्सार अहमद, स्वप्नील खेडकर, शिवकुमार दुबे, एजाज अहमद, भीमराव दिपके यांनी केली़