निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी आज होणार प्रसिध्द!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:20 AM2021-09-27T04:20:24+5:302021-09-27T04:20:24+5:30

यादी आज होणार होणार प्रसिध्द! जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांमध्ये उमेदवारांनी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जांसंदर्भात अपील दाखल झाल्याचा ...

The list of candidates contesting the elections will be published today! | निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी आज होणार प्रसिध्द!

निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी आज होणार प्रसिध्द!

Next

यादी आज होणार होणार प्रसिध्द!

जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांमध्ये उमेदवारांनी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जांसंदर्भात अपील दाखल झाल्याचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्राप्त झाला नाही. एकाही ठिकाणी अपील दाखल नसल्याने जिल्हयातील पोटनिवडणुका होत असलेल्या जिल्हा परिषद गट आणि पंचायत समित्यांच्या गणांतील निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी २७ सप्टेंबर रोजी दुपारी ३.३० वाजतानंतर प्रसिध्द करण्यात येणार आहे.

.........................................................

तालुकानिहाय अशी आहे उमेदवारांची संख्या !

तालुका जि.प. उमेदवार पं.स. उमेदवार

तेल्हारा १९ २१

अकोट १५ २०

मूर्तिजापूर १० १९

अकोला २६ २८

बाळापूर ११ २७

बार्शिटाकळी ०८ २६

पातूर ०६ २०

.................................................................................

एकूण ९५ १६१

................................................................

जि.प.च्या तीन गटातील ‘बंडोबां’ची

‘वंचित’ कडून मनधरणी!

जिल्हा परिषदेच्या अडगाव, घुसर आणि दगडपारवा या तीन गटात वंचित बहुजन आघाडीने जाहीर केलेल्या अधिकृत उमेदवारांव्यतिरक्त पक्षाच्या तीन उमेदवारांकडून उमेदवारी दाखल केली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या या तीन गटांत पक्षाच्या अधिकृत उमेदवारांव्यतिरक्त पक्षाच्या उमेदवारांकडून दाखल करण्यात आलेली उमेदवारी मागे घेण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या स्थानिक पुढाऱ्यांकडून संबंधित ‘बंडोबां’सोबत चर्चा करून मनधरणी केली जात असल्याची माहिती आहे.

..........................................................

Web Title: The list of candidates contesting the elections will be published today!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.