साहित्य क्षेत्राला मिळाली उभारी; सांस्कृतिक क्षेत्राची माेठी हानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:19 AM2020-12-31T04:19:47+5:302020-12-31T04:19:47+5:30

काेराेना प्रतिबंधासाठी सुरू केलेल्या लाॅकडाऊनमुळे ऑनलाइन कार्यक्रमांना सुरुवात झाली. लाेककवी डाॅ. विठ्ठ्ल वाघ यांचा अमृत महाेत्सवी साेहळा शिवाजी महाविद्यालयात ...

The literary sector got a boost; Great loss to the cultural sector | साहित्य क्षेत्राला मिळाली उभारी; सांस्कृतिक क्षेत्राची माेठी हानी

साहित्य क्षेत्राला मिळाली उभारी; सांस्कृतिक क्षेत्राची माेठी हानी

Next

काेराेना प्रतिबंधासाठी सुरू केलेल्या लाॅकडाऊनमुळे ऑनलाइन कार्यक्रमांना सुरुवात झाली. लाेककवी डाॅ. विठ्ठ्ल वाघ यांचा अमृत महाेत्सवी साेहळा शिवाजी महाविद्यालयात थाटात पार पडला. यानिमित्ताने साहित्यिकांची मांदियाळी जमली हाेती. नामवंत साहित्यिक, विचारवंत, कलावंतांनी यावेळी हजेरी लावली हाेती.

२६ जानेवारी २०२०ला तरुणाई फाउंडेशनचे पहिले अकाेला जिल्हा साहित्य संमेलन बापूराव झटाले यांच्या अध्यक्षतेखाली रंगले. या संमेलनाने जिल्ह्यातील साहित्यिकांना बहुमान मिळवून दिला. फेब्रुवारीमध्ये अकाेल्याच्या शब्दसृष्टी साहित्य मंडळाचे चाैथे राज्यस्तरीय युवा मराठी साहित्य संमेलन वाशिम येथे पार पडले. दरम्यान, वऱ्हाडी कट्टा या फेसबुक समूहाने सातत्याने ऑनलाइन कार्यक्रम घेऊन रसिकांची पसंती मिळवली. एवढेच नव्हे तर वऱ्हाडी कट्टा स्नेहमीलन साेहळा नाेव्हेंबर २०२० मध्ये पार पडला. या साेहळ्याला राज्यातील नामवंत साहित्यिकांसाेबतच नवाेदित कवी, लेखकांनी हजेरी लावली. काेराेनाच्या संकटकाळात साहित्यिकांची मने जाेडण्याचे काम या साेहळ्याने केले.

साहित्यिकांनी, संस्थांनी ऑनलाइन संवादाच्या माध्यमातून नवविचारांची पेरणी केली. यामध्ये अखिल भारतीय वऱ्हाडी साहित्य मंच, अंकुर साहित्य संघ, प्रतिभा साहित्य संघ, शब्दवेल समूह, मराठी साहित्य वार्ता, सृजन साहित्य संघ, अखिल वैदर्भीय वऱ्हाडी साहित्य प्रतिष्ठान यांच्यासह विविध संस्थांनी यासाठी पुढाकार घेतला. डाॅ. रावसाहेब काळे यांचे वऱ्हाडी बाेलीभाषेचा मानसशास्त्रीय अभ्यास हे पुस्तक वाचकांसमाेर आले.

साहित्याला अभ्यासक्रमात मिळाले स्थान

अकाेला जिल्ह्यातील साहित्यिकांच्या साहित्याची दखल विविध अभ्यास मंडळाने घेतली. लाेककवी डाॅ. विठ्ठल वाघ, फटाकेकार ॲड. अनंत खेळकर, युवाकवी किशाेर बळी, कथाकार विजय पाटील, गुल्लेरकार नरेंद्र इंगळे, वऱ्हाडी कवी विठ्ठ्ल कुलट, रवींद्र महल्ले, प्रा. विकास सदाशिव यांच्या साहित्याला विविध अभ्यासक्रमात स्थान मिळाले.

घाटाेळ, असनारे, जवादे यांचा सन्मान

ज्येष्ठ रंगकर्मी अरुण घाटोळ यांना डॅडी देशमुख स्मृती जीवन गौरव पुरस्काराने पालकमंत्री ना. बच्चू कडू यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. कवी प्रशांत असनारे यांच्या ‘मीच माझा माेर’ या काव्यसंग्रहाचा अनुवाद औरंगाबाद येथील असलम मिर्जा यांनी केला. या पुस्तकास साहित्य अकादमी, नवी दिल्लीचा पुरस्कार मिळाला. विदर्भ साहित्य संघाचा यंदाचा वा. ना. देशपांडे स्मृती पुरस्कार मूर्तिजापूर येथील कवी रवींद्र जवादे यांना जाहीर झाला.

————————

नाट्य स्पर्धांनाही मिळाला ब्रेक

दरवर्षी महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक संचालनालयाच्या वतीने राज्यस्तरीय, विभागस्तरीय नाट्य स्पर्धांचे आयाेजन केले जाते. मात्र यंदा काेराेनामुळे या स्पर्धांनाही ब्रेक लागला. नृत्यकलाविष्कार संस्थांनी ऑनलाइन उपक्रमांचे आयाेजन करून अभ्यासात सातत्य ठेवले.

Web Title: The literary sector got a boost; Great loss to the cultural sector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.