साहित्य प्रेरणेतूनच चित्रपटक्षेत्रात वाटचाल- राजदत्त

By admin | Published: February 15, 2016 02:18 AM2016-02-15T02:18:03+5:302016-02-15T02:18:03+5:30

सतीश देशमुख यांच्या ‘प्रत्यय’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन व सत्कार सोहळा.

Literature enters the field of inspiration - Rajdutt | साहित्य प्रेरणेतूनच चित्रपटक्षेत्रात वाटचाल- राजदत्त

साहित्य प्रेरणेतूनच चित्रपटक्षेत्रात वाटचाल- राजदत्त

Next

अकोला: साहित्य माणसाला प्रेरणा देत असतं. माझ्या चित्रपटसृष्टीतील वाटचालीला साहित्यातूनच बळ मिळाल्याने या क्षेत्रात चांगले काम करू शकलो, असे प्रतिपादन ज्येष्ठ सिनेदिग्दर्शक तथा संस्कार भारतीचे अध्यक्ष राजदत्त यांनी रविवारी येथे केले.
प्रमिलाताई ओक नाट्यगृहात दामोदर उपाख्य नानासहेब देशमुख ट्रस्ट श्री भवानी आयोजित काव्यसंग्रह प्रकाशन व सस्कार सोहळ्य़ाच्या अध्यक्षस्थानाहून राजदत्त बोलत होते. कविवर्य डॉ. विठ्ठल वाघ, समीक्षक डॉ. अशोक पळवेकर, महापौर उज्ज्वला देशमुख व सतीश देशमुख वेणीकोठीकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
राजदत्त म्हणाले, कवी सभोवालचा अनुभव त्याच्या आशयघन शब्दांतून व्यक्त करीत असतो. प्रत्येकाची अभिव्यक्ती ही सारखी असू शकत नाही. त्यामुळे त्यांना मुक्तपणे व्यक्त होऊ द्यावं. कवीच्या मनातील भावविश्‍व जेव्हा वाचकांना भावतं, तेच कवीचं यश असते. वेणीकोठीकरांच्या कविता तशाच समृद्ध, आशयघन होतील, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.
डॉ. वाघ यांनी वेणीकोठीकरांच्या कविता दगडाला पाझर फोडणार्‍या असून, व्यक्तीकडून समष्टीकडे जाणार्‍या असल्याचे समीक्षण आपल्या शैलीत केले. कविता अर्थवाही असावी, तर प्रतिभा ही प्रतिकांतून व्यक्त झाली पाहिजे, असे मार्मीक संबोधनही त्यांनी केले. महापौर देशमुख यांनी वेणीकोठीकरांच्या कविता वास्तववादी असल्याचे सांग ताना, त्या माणसं जोडणार्‍या असल्याचे प्रतिपादन केले. डॉ. पळवेकरांनी यावेळी त्यांच्या कवितेवर सुंदर विवेचन केले. वेणीकोठीकरांनी प्रास्ताविकातून त्यांची भूमिका मांडली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सतीश देशमुख वेणीकोठीकर यांचा ह्यप्रत्ययह्ण हा काव्यसंग्रह तसेच 'मुक्तछंद' अनियतकालकाचे प्रकाशन उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते पार पडले. यावेळी विविध क्षेत्रांमध्ये अतुलनीय कामगिरी करणार्‍या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारे सनत आहाळे यांचा शाल-श्रीफळ व काव्यसंग्रह देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला. शेतकर्‍यांच्या न्यायासाठी काम करणारे प्रवीण देशमुख, 'रजधूळ'च्या माध्यमातून लोक-साहित्य प्रबोधन करणार्‍या देवकाबाई देशमुख, कवी-साहित्यिक सुरेश पाचकवडे यांचा सत्कारमूर्तींंमध्ये समावेश होता. सतीश देशमुख वेणीकोठीकर यांचा राजदत्त यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Web Title: Literature enters the field of inspiration - Rajdutt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.