सर्व शिक्षा अभियान कार्यालयातून साहित्य लंपास

By admin | Published: January 6, 2017 02:40 AM2017-01-06T02:40:28+5:302017-01-06T02:40:28+5:30

अज्ञात चोरट्यांनी ५५ हजार रुपयांचे साहित्य लंपास केले.

Literature Lampass from the Office of Sarva Shiksha Abhiyan | सर्व शिक्षा अभियान कार्यालयातून साहित्य लंपास

सर्व शिक्षा अभियान कार्यालयातून साहित्य लंपास

Next

अकोला, दि. ५- जिल्हा परिषद आगरकर शाळा परिसरात असलेल्या सर्व शिक्षा अभियान कार्यालयातून अज्ञात चोरट्यांनी ५५ हजार रुपयांचे साहित्य लंपास केल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली. याप्रकरणी रामदासपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला. कार्यालयातील जुने संगणक, खुच्र्या, स्टेशनरी, वॉटर कूलर, बॅटरी, इन्वर्टर आदी साहित्य अज्ञात चोरट्यांनी लंपास केले. सर्व शिक्षा अभियान कार्यालयात गुरुवारी काही कर्मचारी गेल्यावर त्यांना साहित्य लंपास केल्याचा प्रकार लक्षात आला. चोरट्यांनी एकूण ५५ हजार रुपये किमतीचे साहित्य लंपास केले. यापूर्वीसुद्धा आगरकर शाळेच्या परिसरात चोरीच्या घटना घडल्या आहेत. प्रसाद यांच्या तक्रारीनुसार रामदासपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

Web Title: Literature Lampass from the Office of Sarva Shiksha Abhiyan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.