पशुधन विकास मंडळ अकोल्यातच राहणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2017 01:57 AM2017-08-04T01:57:32+5:302017-08-04T01:58:51+5:30
अकोला : महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ अकोल्यातच राहणार असल्याचे आश्वासन पशुसंवर्धन दुग्धविकास राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांनी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांना दिले. या विषयावर राज्यमंत्री खोतकर यांच्या दालनात गुरुवारी बैठक घेण्यात आली होती. मंडळ हलविले नसून, पदे रिक्त असल्याने सध्या मंडळाचा अतिरिक्त पदभार पुणे येथील पशुसंवर्धन विभागाच्या आयुक्तांकडे देण्यात आला असल्याचे त्यांनी यावेळी अधोरेखित केले.
लोकमत न्यूज नेटवर्क

पशुधन विकास मंडळाचे राज्यस्तरीय मुख्यालय अकोला येथून पुण्याला हलविण्याचे अनेकदा प्रयत्न झाले. त्यासाठीच या कार्यालयाला कायमस्वरूपी मुख्य कार्यकारी अधिकारी देण्याचे टाळण्यात येत होते. मध्यंतरी मुख्य कार्यकारी अधिकारी दिला; पण सध्या सर्व अधिकारी सेवानवृत्त झाले आहेत. पदे भरेपर्यंंत पुण्याहून मंडळाचे कामकाज चालणार आहे.
विदर्भातील पशुधनाचा विकास तसेच राज्यातीलही पशुधनाचा विकास होण्यासाठी या मंडळाची अकोला येथे स्थापना करण्यात आली आहे. शेतकरी आत्महत्यांच्या सत्रानंतर केंद्र व राज्य शासनाने पॅकेज जाहीर केले होते. त्यावेळी भरघोस निधीची उपलब्धता या मंडळाला करण्यात आली होती. त्यातून अनेक पशुधनासाठीच्या योजना राबविण्यात आल्या होत्या. पॅकेज असेपर्यंंत या मंडळावर काही काळ मुख्य कार्यकारी पद कायम होते. पॅकेज संपताच हे पद रिक्त झाले. त्यानंतर बर्याचदा मंडळाच्या वरिष्ठ अधिकार्यांनी प्रभारी म्हणून काम बघितले; परंतु महत्त्वाचे निर्णय घेताना अडचणी येत असल्याने ‘लोकमत’ने त्यावेळी शासनाच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर येथे मुख्य कार्यकारी अधिकारी पद भरण्यात आले; परंतु ते अधिकारी कायम येथे राहत नसल्याने पुण्याहून हा कारभार चालत असल्याचा आरोप होत होता, तसेच मुख्यालय हालचालीचे अनेक वेळा प्रयत्न झाले. २0१५ मध्ये हे कार्यालय पुण्याला जाणार होते. यासंदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच शिवसंग्रामचे नेते शिवा मोहोड यांनी आंदोलन केले होते. सध्या हे मुख्यालय अकोला येथेच राहणार असले, तरी शेतकरी हिताच्या योजना राबविण्यासाठी येथे कायमस्वरू पी मुख्य कार्यकारी अधिकारी देण्याची मागणी होत आहे.