पशुधन मंडळ हलविण्याच्या हालचालींना वेग!
By Admin | Published: July 4, 2015 12:26 AM2015-07-04T00:26:03+5:302015-07-04T00:26:03+5:30
अकोला येथून पशूधन मंडळ नागपूर किंवा पुण्याला नेणार; अनेक पदे ठेवली रिक्त.
अकोला : पशुधन मंडळाचे मुख्यालय अकोला येथून हलविण्याच्या हालचाली पुन्हा सुरू झाल्या असून, हे मुख्यालय नागपूर किंवा पुण्याला नेण्याचा घाट घातला जात आहे. म्हणूनच महत्त्वाची अनेक पदे रिक्त ठेवण्यात आली असल्याचे वृत्त आहे. विदर्भ, मराठवाडा उर्वरित राज्यातील शेती, दुग्ध व्यवसाय प्रमुख रोजगाराचे साधन आहे. या व्यवसायाला आधार देण्यासाठी अकोला येथे राज्य पशुधन विकास मंडळाचे मुख्यालय देण्यात आले आहे. २00३ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी या मुख्यालयाचे उद्घाटन केले होते. तथापि, उद्घाटन केले पण या मंडळाला स्थायी मुख्य कार्यकारी अधिकारी हे पद मिळाले नव्हते. स्थायी मुख्य कार्यकारी अधिकारी नसल्याने या मंडळाचा कारभार पुणे व मुंबईहून हाकण्यात येत होता. राज्य, केंद्र शासनाने जेव्हा मोठे पॅकेज दिले होते तेव्हा मात्र मुख्याधिकारी येथे आले, पण पॅकेज संपले आणि सर्व ओस पडले आहे. ह्यलोकमतह्णने याबाबत वाचा फोडल्याने शासनाने नुकतीच स्थायी मुख्य कार्यकारी अधिकार्यांची नियुक्ती केली. पण आजही या मुख्यालयातील दोन उप आयुक्त, दोन सह आयुक्त व इतर महत्त्वाची पदे रिक्त आहेत. दरम्यान, हे मंडळ येथून हलविण्याच्या हालचाली केव्हाच सुरू झाल्या आहेत. नागपूर व पुण्याला नेण्यासाठीची मंत्र्यामध्ये रस्सीखेच सुरू होती. पुन्हा आता या संदर्भात नव्याने हालचालींना वेग आल्याचे वृत्त असून, हे मुख्यालय विदर्भात असल्यानेच याकडे दुर्लक्ष केले जात असल्याची शेतकर्यांची प्रतिक्रिया आहे.