शिक्षण विभागातील रिक्त पदांचा भार शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांवर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:25 AM2020-12-30T04:25:46+5:302020-12-30T04:25:46+5:30
संतोष येलकर.....अकोला : शिक्षण विभागांतर्गत राज्यात तालुकास्तरावरील गटशिक्षणाधिकारी, शालेय पोषण आहार अधीक्षकांची ४३७ पदे रिक्त असून, या रिक्त पदांचा ...
संतोष येलकर.....अकोला : शिक्षण विभागांतर्गत राज्यात तालुकास्तरावरील गटशिक्षणाधिकारी, शालेय पोषण आहार अधीक्षकांची ४३७ पदे रिक्त असून, या रिक्त पदांचा अतिरक्त भार शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांना सांभाळावा लागत आहे.
शिक्षण विभागांतर्गत राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये तालुकास्तरावर गटशिक्षणाधिकारी, शालेय पोषण आहार अधीक्षक इत्यादी संवर्गातील पदे रिक्त असल्याने, या रिक्त पदांचा प्रभार शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांकडे देण्यात आला आहे. शिक्षण विभागांतर्गत राज्यात सद्यस्थितीत ८१० शिक्षण विस्तारी अधिकारी कार्यरत असून, त्यापैकी ४३७ शिक्षण विस्तार अधिकारी उपशिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी व शालेय पोषण आहार अधीक्षक पदांचा प्रभार सांभाळत आहेत. शिक्षण विस्तार अधिकारी उपशिक्षणाधिकारी गटशिक्षणाधिकारी व शालेय पोषण आहार अधीक्षकपदांचा प्रभार सांभाळत असल्याच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांना वर्ग...२ चा दर्जा देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षण विस्तार अधिकारी संघटनाकडून केली जात आहे.
अशी आहेत रिक्त पदे!
शिक्षण विभागांतर्गत राज्यातील विविध जिल्ह्यांत सद्यस्थितीत २५६ गटशिक्षणाधिकारी व १८१ शालेय पोषण आहार अधीक्षकांची पदे रिक्त आहेत. या रिक्तपदांचा प्रभार शिक्षण विभागांतर्गत शिक्षण विस्तार अधिकारी सांभाळीत आहेत.
शिक्षण विभागांतर्गत राज्यात सद्यस्थितीत गटशिक्षणाधिकारी व शालेय पोषण आहार अधीक्षकांची ४३७ पदे रिक्त असून, या पदांचा अतिरिक्त प्रभार शिक्षण विस्तार अधिकारी सांभाळत आहेत. त्यामुळे शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांना वर्ग...२ चा दर्जा देण्यात यावा, अशी आमची मागणी असून, त्यासाठी शासनाच्या ग्रामविकास विभागाकडे संघटनेकडून पाठपुरावा करण्यात येत आहे.
राजेंद्र आंधळे, सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य शिक्षण विस्तार अधिकारी संघटना