अकोलेकरांना भारनियमनाचे चटके; भाजपाचे निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2018 02:00 PM2018-10-12T14:00:01+5:302018-10-12T14:00:19+5:30

कोणत्याही परिस्थितीत सायंकाळनंतर भारनियमन न करण्याचे निर्देश गुरुवारी आमदार गोवर्धन शर्मा यांनी महावितरणचे अधीक्षक अभियंता पवनकु मार कछोट यांना दिले.

loadshading in akola; BJP's plea | अकोलेकरांना भारनियमनाचे चटके; भाजपाचे निवेदन

अकोलेकरांना भारनियमनाचे चटके; भाजपाचे निवेदन

Next

अकोला : ऐन सणासुदीच्या काळात महावितरण कंपनीकडून जुने शहरात अघोषित भारनियमन सुरू करण्यात आल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. वीज निर्मिती करणाऱ्या प्रकल्पांसाठी कोळशाचा पुरवठा होत नसून, तुटवडा निर्माण झाल्याने ही समस्या उद्भवल्याचे चित्र समोर आले आहे. ही समस्या तातडीने निकाली काढून कोणत्याही परिस्थितीत सायंकाळनंतर भारनियमन न करण्याचे निर्देश गुरुवारी आमदार गोवर्धन शर्मा यांनी महावितरणचे अधीक्षक अभियंता पवनकु मार कछोट यांना दिले. यावेळी भाजपाच्यावतीने निवेदन सादर करण्यात आले.
नवदुर्गा उत्सवाला सुरुवात होताच जुने शहर व इतर भागात महावितरण कंपनीच्यावतीने अघोषित भारनियमन सुरू झाले आहे. ऐन सणासुदीच्या दिवसांत भारनियमन केले जात असल्याने नागरिकांमध्ये कंपनीच्या विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. नागरिकांची ओरड लक्षात घेता गुरुवारी अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार गोवर्धन शर्मा, महानगराध्यक्ष किशोर मांगटे पाटील यांच्यासह भाजप पदाधिकारी, नगरसेवकांनी महावितरण कार्यालयात धाव घेऊन अधीक्षक अभियंता पवनकु मार कछोट यांची भेट घेतली. वीज निर्मिती करणाºया प्रकल्पांना कोळशाचा पुरेशा प्रमाणात पुरवठा होत नसून, तुटवडा निर्माण झाला आहे. त्याचा परिणाम वीज निर्मितीवर झाल्याचे अधीक्षक अभियंता कछोट यांनी सांगितले. या समस्येवर तातडीने तोडगा काढण्याचे निर्देश आ. गोवर्धन शर्मा यांनी दिले. याप्रसंगी नगरसेवक अजय शर्मा, विजय इंगळे, विनोद मापारी, सुनील क्षीरसागर, अनिल गरड, अमोल गोगे, श्याम विंचनकर, धनंजय गिरीधर, प्रशांत अवचार, राजेश चौधरी, दिलीप मिश्रा, वैकुंठराव ढोरे, एकनाथ ढोरे, रमेश करीहार, बबलू पळसपगार, बबलू सावंत, अनुप गोसावी आदी उपस्थित होते.

वीज वाहिनीचा मार्ग मोकळा करा!
गोरक्षण रोडच्या कामाला अडथळा ठरणारे जुने विद्युत खांब त्वरित हटवून गोरक्षण रोडप्रमाणेच डाबकी रोडवरील जोगळकेर प्लॉटमध्ये उभारलेल्या नवीन पोलवरील वीज वाहिनीचा मार्ग मोकळा करण्याचे निर्देश आ. शर्मा यांनी दिले. नागरिकांनी शुल्क जमा करूनही त्यांना विद्युत मीटर व विद्युत पुरवठा उपलब्ध होत नसल्याचे निदर्शनास आले असून, हा तिढा तातडीने निकाली काढण्याची सूचना आ. शर्मा यांनी केली.

--फोटो- ११ सीटीसीएल- ०७--

 

Web Title: loadshading in akola; BJP's plea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.