सावकारी कर्जमाफी योजना: चार शेतकऱ्यांचे गहाण सोने केले परत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2020 12:31 PM2020-01-18T12:31:24+5:302020-01-18T12:31:31+5:30
चारही शेतकºयांच्या कर्जाची रक्कम व्याजासह जिल्हा उपनिबंधक कार्यालयामार्फत संबंधित परवानाधारक सावकाराकडे जमा करण्यात येणार आहे.
अकोला: सावकारी कर्जमाफी योजनेची जिल्ह्यात अंमलबजावणी सुरू करण्यात आली असून, अकोला तालुक्यातील चार शेतकऱ्यांनी एका परवानाधारक सावकाराकडे गहाण ठेवलेले सोने शुक्रवारी संबंधित शेतकºयांना परत करण्यात आले. चारही शेतकºयांच्या कर्जाची रक्कम व्याजासह जिल्हा उपनिबंधक कार्यालयामार्फत संबंधित परवानाधारक सावकाराकडे जमा करण्यात येणार आहे.
परवानाधारक सावकारांकडून शेतकºयांनी घेतलेले कर्ज माफ करण्याची योजना शासनामार्फत राबविण्यात येत आहे. त्यामध्ये शेतकºयांनी परवानधारक सावकारांकडे गहाण ठेवलेले सोने शेतकºयांना परत करून, कर्जाची रक्कम व्याजासह संबंधित परवानाधारक सावकारांकडे जमा करण्यात येत आहे. सावकारी कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीत अकोला तालुक्यातील चार शेतकºयांनी एका परवानाधारक सावकाराकडे गहाण ठेवलेले सोने संबंधित चार शेतकºयांना १७ जानेवारी रोजी परत करण्यात आले असून, चारही शेतकºयांनी परवानाधारक सावकाराकडून घेतलेल्या कर्जाची रक्कम आणि त्यावरील व्याजापोटी एकूण २ लाख २० हजार ८२७ रुपयांची रक्कम संबंधित परवानाधारक सावकराकडे जमा करण्यात येणार असल्याचे जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) डॉ. प्रवीण लोखंडे यांनी सांगितले.