स्थानिक गुन्हे शाखेची गावठी दारू अड्यांवर छापेमारी
By सचिन राऊत | Published: April 7, 2024 06:09 PM2024-04-07T18:09:18+5:302024-04-07T18:09:50+5:30
दोन ठिकाणावरून ८०० पेक्षा अधिक लिटर दारू साठा हस्तगत करण्यात आला आहे.
उरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत केली कारवाई दारूच्या साठ्यासह मुद्देमाल जप्त अकोला : बाळापुर तालुक्यातील उरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डोंगरगाव येथील शेतशिवारात सुरू असलेल्या गावठी दारू अड्ड्यांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी छापेमारी केली. दोन ठिकाणावरून ८०० पेक्षा अधिक लिटर दारू साठा हस्तगत करण्यात आला आहे.
या दारूची किंमत सुमारे एक लाख रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली. डोंगरगाव परिसरात गावठी दारू अड्डे सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. यावरून पथकाने रविवारी छापेमारी केली. त्यानंतर डोंगरगाव येथील रहिवासी दादाराव सुलताने व गजानन पाखरे या दोघांच्या गावठी दारू अड्ड्यावरून सुमारे ६५० लिटर दारू साठा जप्त करण्यात आला आहे. या दोघांनीही घटनास्थळावरून पळ काढला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
या सोबतच नारायण पांडे रा डोंगरगाव याच्या गावठी दारूवड्यावरही पोलिसांनी पाहणी करून मुद्देमाल जप्त केला आहे. त्यानंतर शेगाव तालुक्यातील घूई येथील रहिवासी संतोष मेहंगे याच्या दारू आड्यावरही पोलिसांनी छापा टाकून दारू साठा व जप्त केला. त्यांच्याविरुद्ध उरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक बच्चन सिंह, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, स्थानिक गुन्हे शाखाप्रमुख शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनात पीएसआय गोपाल ढोले, राज बचे, निखिल माळी, विकास वैदकार व उरळ पोलिसांनी केली.