गावठी दारू भट्टी चालविणाऱ्यास एक वर्षासाठी केले स्थानबद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:21 AM2021-03-09T04:21:06+5:302021-03-09T04:21:06+5:30

अकोला पोलिसांनी केली एमपीडीए अंतर्गत कारवाई अकोला : मूर्तिजापूर तालुक्यातील किनखेड येथील रहिवासी तसेच अवैधरित्या दारू भट्टी चालविणाऱ्या इसमास ...

Located for a year to the village distillery operator | गावठी दारू भट्टी चालविणाऱ्यास एक वर्षासाठी केले स्थानबद्ध

गावठी दारू भट्टी चालविणाऱ्यास एक वर्षासाठी केले स्थानबद्ध

Next

अकोला पोलिसांनी केली एमपीडीए अंतर्गत कारवाई

अकोला : मूर्तिजापूर तालुक्यातील किनखेड येथील रहिवासी तसेच अवैधरित्या दारू भट्टी चालविणाऱ्या इसमास जिल्हाधिकारी यांच्या आदेशानंतर जिल्हा मध्यवर्ती कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे.

मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी इंद्रगोल डेबाजी रामचवरे वय ५३ वर्षे हा गावात अवैधरित्या गावठी हातभट्टीची दारू तयार करणे, दारूची वाहतूक करणे तसेच अवैधरित्या गावठी दारूची विक्री करीत असल्याने त्याच्यावर पोलिसांनी वारंवार कारवाई केलेली आहे; मात्र त्यानंतरही तो गावठी दारू भट्टी अवैधरित्या चालवित असल्याची माहिती पोलिसांन मिळाली. त्यामुळे पोलिसांनी त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली; मात्र या कारवाईला तो जुमानत नसल्याने अकोला पोलिसांनी त्याच्याविरुद्ध एमपीडीए अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव जिल्हा दंडाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्याकडे सादर केला. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रस्तावाला मंजुरी देऊन या आरोपीला एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचा आदेश पारित केला. त्यानंतर पोलीस अधीक्षक जी श्रीधर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने आरोपीचा शोध घेऊन त्यास जिल्हा मध्यवर्ती कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध केले आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख शैलेश सपकाळ, मंगेश महल्ले, आर जी. शेख, मानकर यांनी केली.

Web Title: Located for a year to the village distillery operator

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.