लॉकडाऊनने आणले कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:20 AM2021-04-28T04:20:01+5:302021-04-28T04:20:01+5:30

या वर्षी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांदा उत्पादनासाठी गगनभरारी भाववारी असलेले कांदा बियाणे खरेदी करून कांद्याची लागवड केली. त्यासाठी वारेमाप ...

Lockdown brings tears to the eyes of onion growers! | लॉकडाऊनने आणले कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी!

लॉकडाऊनने आणले कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी!

googlenewsNext

या वर्षी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांदा उत्पादनासाठी गगनभरारी भाववारी असलेले कांदा बियाणे खरेदी करून कांद्याची लागवड केली. त्यासाठी वारेमाप खर्च करून, प्रसंगी कर्ज काढून, कांदा पिकाचे उत्पादन घेणे सुरू आहे. मात्र, कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गेल्या वर्षी झालेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कमी मिळालेले दर, यंदाही कोरोना महामारीमुळे शेतकऱ्यांचे झालेले हाल व बसलेल्या फटक्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हादरून गेले. या वर्षी पुन्हा कोरोना महामारीने डोके वर काढले असल्याने, पुन्हा कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडला असल्याचे दिसून येत आहे. या वर्षी कांदा पिकाच्या काढणीला सुरुवात झाली, तर काही शेतकऱ्याचा कांदा तयार होऊन विक्रीसाठी तयार आहे. मात्र, कोरोना लॉकडाऊनमुळे जमा झालेल्या कांदा पिकाची विक्री करण्याची पंचाईत झाली आहे. शासनाने कांदा उत्पादक शेतकऱ्यासाठी कांदा विक्रीकरिता जिल्हास्तरावर कांदा खरेदी बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची गरज आहे.

फोटो: फोटो मेल

कांदा पिकाची दोन एकरात लागवड केली असुन कांदा पिकासाठी आतापर्यंत चांगला खर्च झाला. सतत सुरू असलेल्या नैसर्गिक आपत्ती मुळे व कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कांदा पिकाची शासनाकडून भाववाढ होणे गरजेचे आहे.

- रेखा साखरचंद गवई,

कांदा उत्पादक शेतकरी

कोरोना व्हायरसचा वाढत्या प्रादुर्भाव कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा पिकाचे निघालेले उत्पादन विक्रीसाठी शासनाने जिल्हास्तरावर बाजारपेठ निर्माण केल्यास शेतकऱ्याची होणारी आर्थिक लुट थांबेल व योग्य भाववारी मिळेल.

-राजेश अत्तरकार, कांदा उत्पादक शेतकरी

Web Title: Lockdown brings tears to the eyes of onion growers!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.