Lockdown Efect : खाद्यपदार्थ विक्री ठप्प; एक कोटीचा फटका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2020 10:39 AM2020-04-24T10:39:08+5:302020-04-24T10:39:20+5:30

जिल्ह्यातील तब्बल साडेतीन ते चार हजार किरकोळ खाद्यपदार्थ व्यावसायिकांची दिवसाची सरासरी ८० लाख ते एक कोटी रुपयांची दैनंदिन उलाढाल ठप्प झाली आहे.

 Lockdown Effect: Food sales halt; One crore blow! | Lockdown Efect : खाद्यपदार्थ विक्री ठप्प; एक कोटीचा फटका!

Lockdown Efect : खाद्यपदार्थ विक्री ठप्प; एक कोटीचा फटका!

Next

- सचिन राऊत  
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : ‘कोरोना’ विषाणूचा सामुदायिक संसर्ग टाळण्याकरिता २४ मार्चपासून ‘लॉकडाउन’ तसेच संचारबंदी असल्यामुळे हातगाडीवर किरकोळ खाद्यपदार्थ विकणारे जिल्ह्यातील तब्बल साडेतीन ते चार हजार किरकोळ खाद्यपदार्थ व्यावसायिकांची दिवसाची सरासरी ८० लाख ते एक कोटी रुपयांची दैनंदिन उलाढाल ठप्प झाली आहे. या किरकोळ खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्यांवर या कालावधीत उपासमारीची वेळ आली आहे.
शहरात किरकोळ खाद्यपदार्थ विक्री करणाºया या व्यावसायिकांची समोसा, कचोरी, रगडा पेटीस, आलू पुरी, मुंगवडा, दहीवडा तसेच आलूवडा विक्रीची रस्त्यावर दुकाने आहेत. अशाच प्रकारचे खाद्यपदार्थ विक्रीच्या हातगाड्या, छोटेखानी हॉटेलही शहरात मोठ्या प्रमाणात आहेत. यासोबतच ग्रामीण भागातील प्रत्येक गावात तसेच मोठ्या खेड्यांमध्येही खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्यांची संख्या चांगलीच असल्याने त्यांची दुकाने ‘लॉकडाउन’मुळे बंद करण्यात आली आहेत.
त्यामुळे किरकोळ खाद्यपदार्थ विक्री करणाºया या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली असून, त्यांनी दुसरे रोजंदारीची कामे सुरू केली आहेत. शहरात फुटपाथवर अतिक्रमण करून व्यवसाय करणाºयांची संख्या यामध्ये अधिक आहे. सदर व्यवसायातून मिळणाºया उत्पन्नाच्या भरवशावर हजारो व्यावसायिकांचा उदरनिर्वाह चालत असल्याचे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले; मात्र ‘लॉकडाउन’पासून त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

कर्जाचा हप्ता आणि उसनवारीची चिंता
किरकोळ व्यावसायिकांमध्ये कुणाला बँकेची, बचत गटाची तसेच मायक्रो फायनान्सच्या कर्जाची किस्त भरायची आहे. अशाच प्रकारे मुलीचे लग्न, मुला-मुलीच्या शाळेचे शुल्क भरण्याची चिंता सतावत आहे. एलआयसी पॉलिसीचा हप्ता भरायचा बाकी असून, तर तातडीची वैद्यकीय सेवा घ्यावी लागते. अनेक किरकोळ व्यावसायिक भाड्याच्या घरात राहतात. त्यांच्यापुढे भाडे चुकविण्याचा प्रश्न उभा ठाकला आहे.

एक किरकोळ व्यावसायिक दररोज किमान दोन ते पाच हजार रुपयांपर्यंत व्यवसाय करतो. त्यामुळे आमच्यासारख्या किरकोळ व्यावसायिकांची जिल्ह्यात ८० लाख ते एक कोटी रुपयांची दैनंदिन उलाढाल असते. त्यामुळे अशा व्यावसायिकांचे ‘लॉकडाउन’च्या कालावधीत मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
- सचिन गावंडे,
किरकोळ खाद्यपदार्थ विक्रेता, कौलखेड, अकोला.


रोज कमवाल तर रोज दोन वेळचे जेवण मिळेल, अशी परिस्थिती काही किरकोळ खाद्यपदार्थ व्यावसायिकांची आहे. अशी परिस्थिती असलेल्या व्यावसायिकांना व्यवसायाची गाडी रुळावर आणण्यासाठी ३ मेपर्यंत वाट बघावी लागणार आहे. त्यामुळे या किरकोळ व्यावसायिकांना दोन वेळच्या जेवणाची मोठी अडचण निर्माण झाल्याने त्यांनी मिळेल ते मजुरीचे काम सुरू केले आहे.
- आकाश ठाकूर,
खाद्यपदार्थ विक्रेता गांधी चौक अकोला.


जीवनावश्यक वस्तू वगळता इतर कुठल्याही व्यवसायास संचारबंदीत प्रतिबंध करण्यात आला आहे. त्याकारणाने २० दिवसांहून अधिक काळासाठी आपला व्यवसाय बंद ठेवण्याची वेळ आली. अजून किमान दोन आठवडे तरी त्यांना व्यवसाय सुरू करता येणार नाही. त्यामुळे आता चरितार्थ कसा चालवायचा, असा प्रश्न आहे.
- निखिल भाकरे,
खाद्यपदार्थ विक्रेता, दुर्गा चौक अकोला.

Web Title:  Lockdown Effect: Food sales halt; One crore blow!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.