लॉकडाऊनचा शेवगा शेतीला फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:18 AM2021-03-14T04:18:18+5:302021-03-14T04:18:18+5:30
वातावरणात अवेळी होणारा बदल, भावात होणारी चढ-उतार, यामुळे पारंपरिक पिकांना फाटा देत, शेतकरी प्रयोगशिलतेकडे वाटचाल करीत आहे. वाढत्या सिंचन ...
वातावरणात अवेळी होणारा बदल, भावात होणारी चढ-उतार, यामुळे पारंपरिक पिकांना फाटा देत, शेतकरी प्रयोगशिलतेकडे वाटचाल करीत आहे. वाढत्या सिंचन क्षेत्राबरोबर फुलशेती, फळबागा, विदेशी भाजीपाला अशा विविध पिकांची लागवड शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. मजुरी, उत्पादन खर्च, दर यांचा विचार करता कापूस किंवा अन्य पिकांच्या तुलनेत शेवगा पीक शेतकऱ्यांना फायदेशीर ठरत आहे. शेवग्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात व त्याचे सेवन आरोग्यासाठी लाभदायी ठरते. योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर अनेक शेतकरी शेवगा शेतीकडे वळले आहे. जिल्ह्यातील शेवगा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अकोला, खामगाव ही बाजारपेठ सोईस्कर ठरते. व्यापाऱ्यांकडून चांगला भाव मिळत असल्याने, शेतकरी माल बाजार समितीत न घेऊन जाता व्यापाऱ्यांना विकून मोकळे होतात. लॉकडाऊनच्या काळात शेवग्याची आवक वाढली आहे. याउलट मागणीत घट झाली. परिणामी, शेवगा उत्पादक शेतकऱ्यांना याचा फटका बसत आहे. दरवर्षी शेतकऱ्याचे अर्थकारण उंचावणारी शेवगा शेती दुसऱ्या लॉकडाऊनपासून अडचणीची ठरू लागली आहे. त्यामुळे शेवगा उत्पादकांना कमी भावाने आपला माल विकावा लागत आहे.
--बॉक्स--
शेवग्याची उचल कमी
लॉकडाऊन लागल्यामुळे खेड्यापाड्यातील आठवडी बाजार बंद आहे. त्यामुळे शेवग्याच्या मालाची उचल कमी होत आहे. सोबतच आवकही वाढली. सद्यस्थितीत शेवग्याचे दर कमी झाल्याचे शहरातील व्यापाऱ्यांनी सांगितले.
--कोट--
तीन एकर शेतात शेवगा शेती केली आहे. सुरुवातीला ३,५०० ते ४,००० रुपये प्रति क्विंटलने शेवगा विकला. मात्र, आता कमी भावात विकावे लागत आहे.
नीलेश टिकार, शेतकरी, कोलोरी
--बॉक्स--
लॉकडाऊन आधीचे भाव
३,५०० ते ४,०००
लॉकडाऊननंतरचे भाव
१,५०० ते २,०००
व्यापाऱ्यांकडे आवक
५ ते ७ क्विंटल