लॉकडाउन : एक हजारांपेक्षा अधिक वाहने जप्त; ८ लाखांचा दंड वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2020 05:11 PM2020-05-04T17:11:32+5:302020-05-04T17:11:44+5:30
आतापर्यंत तब्बल एक हजारांपेक्षा अधिक वाहने जप्त केली आहेत.
अकोला : कोरोनाला रोखण्यासाठी केंद्र शासनाने लॉकडाउन केले असून राज्य शासनाने कठोर पावले उचलत संचारबंदी लागु केलेली असतानाही विनाकारण बाहेर फीरणाऱ्यांवर कारवाईसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांच्या मार्गदर्शनात वाहतुक शाखेचे प्रमूख गजानन शेळके यांनी मोहिम तीव्र करीत आतापर्यंत तब्बल एक हजारांपेक्षा अधिक वाहने जप्त केली आहेत. तर विनाकारण फीरणाºया तब्बल ११ हजारांपेक्षा अधिक वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून ८ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. मात्र तरीही अकोलेकर सुधारण्याच्या मानसीकतेत नसल्याचे दिसून येत आहे.
शहरातील रुग्णांची संख्या तब्बल ६० च्यावर गेली असून कोरोनाने आता ग्रामिण भागातही शिरकाव केला आहे. मात्र तरीही अकोलेकर जागृत होत नसल्याने आता बाहेर फीरणाºया वाहन चालकांची योग्य ती पडताळणी करून त्यांच्यावर कारवाई करण्याचा धडाकाच वाहतुक शाखेचे प्रमूख गजानन शेळके यांनी सुुरु केला आहे. या सपाटयामध्ये त्यांनी गत काही दिवसात तब्बल एक हजारापेक्षा अधिक वाहने जप्त केली आहे. तर ११ हजारांपेक्षा अधिक वाहनांवर कारवाई करीत त्यांच्यकडून ८ लाख रुपयांचा दंड वसुल केला आहे. तर विनाकारण व रिकामटेकडयांची तब्बल एक हजारांपेक्षा अधिक वाहने जप्त करण्यात आली आहेत. जिल्हा प्रशासनाने संध्याकाळी 6 वाजेपर्यंत जीवनावश्यक वस्तू खरेदीच्या दिलेल्या परवानगीचा गैरवापर करून अकोलकर रस्त्यावर गर्दी करताना दिसत असल्याने ही कारवाईची मोहिम तीव्र करण्यात आली आहे.
कोरोनाला अकोलेकर अद्यापही गांभिर्याने घेत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे वाहतूक शाखेने आता कारवाईचा सपाटा सुरु करीत यावर आवर घालण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. विनाकारण रस्त्यावर वाहन चालविणाºया वाहन चालकांना पोलिसी खाक्या दाखविण्याचे निर्देश पोलीस अधीक्षकांनी दिले असून त्यानंतर आता ही मोहिम अधिक तीव्र करण्यात येणार आहे.
गजानन शेळके
वाहतुक शाखा प्रमूख