लॉकडाऊनचा फटका : रसवंतीसाठी लागवड केलेला एक एकर ऊस गुरांना चारला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2020 04:03 PM2020-04-23T16:03:23+5:302020-04-23T16:03:35+5:30

ऊसाला मागणीच नसल्याने अखेर या शेतकºयाला एक एकर ऊसाच्या पिकात नाईलाजास्त गुरे चारावी लागली.

Lockdown: One acre of sugarcane planted for Raswanti grazed cattle | लॉकडाऊनचा फटका : रसवंतीसाठी लागवड केलेला एक एकर ऊस गुरांना चारला

लॉकडाऊनचा फटका : रसवंतीसाठी लागवड केलेला एक एकर ऊस गुरांना चारला

Next

- सत्यशिल सावरकर
तेल्हारा : उन्हाळ्यात रसवंतीचा व्यवसाय करण्यासाठी घरच्या शेतात एक एकर ऊसाची लागवड करणाऱ्या तेल्हारा तालुक्यातील एका शेतकºयाचे हिरवे स्वप्न कोरोनाचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे भंग झाले आहे. लॉकडाऊनमुळे रसवंती व्यवसाय ठप्प पडल्यामुळे ऊसाला मागणीच नसल्याने अखेर या शेतकºयाला एक एकर ऊसाच्या पिकात नाईलाजास्त गुरे चारावी लागली. बेलखेड येथील शेतकरी मनिष शंकराव खुमकर यांनी रसवंती व्यवसाय सुरू करण्यासाठी ऊस लागवड केली होती. फेब्रुवारी महिन्यात रसवंती साठी काही प्रमाणात ऊस गेला; परंतु त्यानंतर लॉकडाऊन मुळे रसवंती व्यवसाय बंद पडले. परिणामी ऊसाला मागणीच नही. दुसरीकडे कडक उन्हामुळे ऊसाचे पिक सुकत चालले होते. त्यामुळे अखेर खुमकर यांनी ऊभ्या पिकात गुरेढोरे सोडून चराई करावी लागली. यामध्ये त्यांचे हजारो रूपयांचे नुकसान झाले आहे. तालुक्यातील ब-याच शेतकऱ्यांनी रसवंती व्यवसाय करण्यासाठी ऊसाची लागवड मोठ्या प्रमाणात केली आहे. त्यांचे झालेले नुकसान पाहता, कृषी विभागाने पाहणी करून नुकसान भरपाई देण्याची मागणी या निमित्ताने शेतकरी बांधवांकडून होत आहे.

रसवंती व्यवसाय करण्यासाठी ऊसाची लागवड केली होती. परंतु लॉकडाऊन मुळे रसवंती व्यवसाय बंद पडला. त्यामुळे नुकसान झाल;े परंतु सद्या कोरोनाची खबरदारी म्हणून झालेले नुकसान सहन केल्याशिवाय पर्याय नाही.
- मनिष शंकरराव खुमकर, शेतकरी बेलखेड

Web Title: Lockdown: One acre of sugarcane planted for Raswanti grazed cattle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.