अकाेला मुर्तीजापूर अकाेट शहरात उद्यापासून ‘लॉकडाऊन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:27 AM2021-02-23T04:27:30+5:302021-02-23T04:27:30+5:30

अकोला : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक व नियंत्रणाची उपाययोजना म्हणून अमरावती विभागीय आयुक्तांनी प्रतिबंधात्मक क्षेत्र व इतर क्षेत्रासाठी ...

'Lockdown' from tomorrow in Akala Murtijapur Akate city | अकाेला मुर्तीजापूर अकाेट शहरात उद्यापासून ‘लॉकडाऊन’

अकाेला मुर्तीजापूर अकाेट शहरात उद्यापासून ‘लॉकडाऊन’

Next

अकोला : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक व नियंत्रणाची उपाययोजना म्हणून अमरावती विभागीय आयुक्तांनी प्रतिबंधात्मक क्षेत्र व इतर क्षेत्रासाठी लाॅकडाऊनच्या निर्देशांचीच घाेषणा केली आहे त्यानुसार जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी अकाेला मुर्तीजापूर अकाेट शहर प्रतिबंधात्मक क्षेत्र घाेषित केले असून हे शहर वगळता तालुक्यातील इतर गावे तसेच तेल्हारा, बाळापूर, बार्शीटाकळी, पातूर तालुक्यासाठी लाॅकडाऊनचे वेगळे आदेश काढले आहे २२ मार्चच्या सकाळी ६ वाजता पासून लाॅकडाऊनचे आदेश देण्यात आले असून त्यानुसार प्रतिबंधात्मक क्षेत्रातील सर्व प्रकारची दुकाने आणि प्रतिष्ठाने केवळ सकाळी ८ ते ३ वाजेपर्यंतच तर प्रतिबंधात्मक क्षेत्र वगळता इतर क्षेत्रासाठी सकाळी ९ ते ५ वाजेपर्यंतच सुरू राहणार आहेत

जिल्ह्यात कोरोनाचा पुन्हा उद्रेक झाला असून, रविवार, २१ फेब्रुवारी रोजी आणखी एक रुग्णाचा मृत्यू झाल्याने एकूण बळींची संख्या ३५३ झाली आहे. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये २२०, तर रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यांमध्ये ५४ अशा एकूण २७६ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या १३,८६९ वर पोहोचली आहे. काेराेनाची ही गंभीर स्थिती लक्षात घेता प्रशासनाने हे कठाेर पाऊल उचलले आहे प्रतिबंधात्मक क्षेत्रासाठीचे आदेश मंगळवार २३ फेब्रुवारीच्या सकाळी सहा वाजेपासून ते सोमवार दि. १ मार्च २०२१ च्या सकाळी आठवाजेपर्यंत लागू राहतील. आदेशाचा भंग करणाऱ्यावर व्यक्तीवर दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल. अशा व्यक्ती, संस्था, संघटना यांचेवर गुन्हे दाखल करण्यासाठी संबंधित पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक दर्जापेक्षा कमी नाही अशा अधिकाऱ्यांना अधिकार बहाल करण्यात आले असल्याचेही जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आदेशाव्दारे कळविले आहे.

अकाेला मुर्तीजापूर अकाेट शहरासाठी प्रतिबंधित क्षेत्र

- केवळ जीवनाश्यक दुकाने किराणा औषधी स्वस्त धान्य दूकाने सकाळी ८ ते सायंकाळी ३ वाजेपर्यंत सुरू राहतील.

-इतर सर्व प्रकारची दुकाने अस्थापना पूर्ण बंद राहतील

- सर्व धार्मिक स्थळे ही पूर्णपणे बंद

या निर्बंधासाेबतच नाॅन कॅन्टेन्मेंट झाेनमधील इतर सर्व निर्बंध या तिन्ही शहरांमध्ये लागू राहतील

प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर क्षेत्रात असे आहेत निर्बंध

-सर्व प्रकारची दुकाने, आस्थापना सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू राहतील.

- ज्या उद्योगांना सुरू ठेवण्याकरिता यापूर्वी परवानगी देण्यात आलेली आहे, ते सर्व उद्योग सुरू ठेवण्याकरिता परवानगी राहील.

- सर्व प्रकारच्या शासकीय कार्यालय बॅंका १५ टक्के किंवा १५ व्यक्ती यांपैकी जी संख्या जास्त असेल ती ग्राह्य धरून सुरू राहतील.

- सर्व प्रकारची उपहारगृहे, हॉटेल्स प्रत्यक्ष सुरू न ठेवता फक्त पार्सल सुविधेस परवानगी राहील.

- लग्न समारंभाकरिता २५ व्यक्तींना (वधू व वरासह) परवानगी अनुज्ञेय राहील.

- मालवाहतूक ही नेहमीप्रमाणे सुरू राहील आणि वाहतुकीसाठी कुठल्याही प्रकारचे निर्बंध राहणार नाही.

- चार चाकी गाडीमध्ये चालकाव्यतिरिक्त इतर ३ प्रवासी तीन चाकी गाडी (उदा. ऑटो) मध्ये चालकाव्यतिरिक्त दोन प्रवासी, दुचाकीवर हेल्मेट व मास्कसह २ प्रवासी यांना परवानगी

- आंतरजिल्हा बस वाहतूक करताना बसमधील असलेल्या एकूण प्रवासी क्षमतेच्या ५० टक्के प्रवाशांसह सोशल डिस्टन्सिंग व निर्जंतुकीकरण करून वाहतुकीकरिता परवानगी

- सर्व धार्मिक स्थळे ही एकावेळी १० व्यक्तींपर्यंत मर्यादित स्वरूपात नागरिकांसाठी सुरू राहतील.

- सर्व प्रकारची शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक प्रशिक्षण केंद्रे, खजगी शिकवणी वर्ग, कोचिंग क्लासेस हे बंद राहतील.

- सर्व प्रकारची सिनेमागृहे, व्यायामशाळा, जलतरण तलाव, मनोरंजन उद्याने, नाट्यगृहे, प्रेक्षकगृहे व अतर संबंधित ठिकाणे ही बंद राहतील.

- सर्व प्रकारची सामाजिक, राजकीय, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम व इतर स्नेहसंमेलन हे या कालावधीत बंद राहतील.

Web Title: 'Lockdown' from tomorrow in Akala Murtijapur Akate city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.