लॉकडाउन : पुण्यात अडकलेल्या युवकाने पुणे ते हिवरखेड सायकलने केला प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2020 09:53 AM2020-05-09T09:53:36+5:302020-05-09T09:54:41+5:30
पुण्यात अडकलेल्या युवकाने कुठलेही वाहन न मिळाल्याने पुणे ते हिवरखेड असा प्रवास सायकलने करीत हिवरखेड गाठले.
हिवरखेड : लॉकडाउन मुळे पुण्यात अडकलेल्या हिवरखेड येथील युवकाने कुठलेही वाहन न मिळाल्याने स्वगृही परतीसाठी पुणे ते हिवरखेड असा प्रवास सायकलने करीत हिवरखेड गाठले. या युवकासह इतरही बाहेरगावहून आलेल्या युवकाचे आगमन झाल्यानंतर त्याची ग्रामपंचायत व कोरोनामुक्त हिवरखेड समितीने आरोग्य तपासणी करण्यात आली.
हिवरखेड येथील बरेच युवक-युवती शिक्षण व नोकरी निमित्ताने पुण्यात स्थित आहे; कोरोना या विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून गेल्या दोन महिन्यांपासून लोकांनी घरातच राहावे, असा आदेश आहे. त्यामुळे पुणेसह देशातील नागरिकांना बाहेर निघत येणे कठीण झाले होते. अशा स्थितीत त्यांना अन्नापासूनसुद्धा वंचित राहण्यात पाळी येत होती; परंतु शासनाने घरी जाण्यास इच्छुक लोकांना परवानगी देण्यासाठी ई-पासेस तयार केल्या आहेत. ई-पासेस मिळविण्यासाठी त्यांना आरोग्य तपासणी अनिवार्य आहे. सर्व अटीची पूर्तता केल्यानंतर प्रवासासाठी ई-पास मिळाल्यानंतर एवढ्या दूरवरून प्रवासासाठी सुविधा नसल्याने अडचणी जात आहे. यावर मात करीत हिवरखेड येथील गिºहे नगरमधील सत्यविजय रमेश जऊळकार हा युवक पुणे येथून हिवरखेडला चक्क सायकलने दाखल झाला. कोविड १९ च्या ग्रामपंचायत व कोरोनामुक्त हिवरखेड समितीकडून त्याची व इतर बाहेरगाव येथून आलेल्यांची डॉ. ठाकरे यांनी आरोग्य तपासणी करून त्यांच्या हातावर स्टॅम्प लावून त्यांना घरातच क्वारंटीन राहण्यास सांगितले. तपासणी केल्यानंतर या युवकाचे ग्रामपचांयतचे ग्रामसेवक भीमराव गरकल, माजी सरपंच सुरेश ओंकारे डॉ. रामदादा तिडके, संवादचे सतीश इंगळे व २प्रेस क्लबचे श्यामशील भोपळे व बाळासाहेब नेरकर यांनी स्वागत केले. (प्रतिनिधी)