पोलीस असल्याची बतावणी करून रोकड लुटणारा गजाआड
By admin | Published: February 22, 2016 02:24 AM2016-02-22T02:24:01+5:302016-02-22T02:24:01+5:30
२५ हजार रुपयांची रोकड पोलीस असल्याची बतावणी करून लुटली होती.
अकोला : शहरातील टॉवर चौक परिसरातील एका रुग्णालयामध्ये दाखल असलेल्या मुलाच्या उपचारासाठी आणलेली २५ हजार रुपयांची रोकड पोलीस असल्याची बतावणी करून लुटणार्या आरोपीस रामदासपेठ पोलिसांनी अटक केली. चंद्रशेखर नितोने असे आरोपीचे नाव असून, त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीस २३ फेब्रुवारीपर्यंंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मूर्तिजापूर येथील रहिवासी शेख नौशाद शेख इब्राहिम यांच्या मुलावर टॉवर चौक परिसरातील एका खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. त्यांच्या मुलाच्या उपचारासाठी अधिक पैशाची गरज असल्याने त्यांनी मू िर्तजापूूर येथून जुळवाजुळव करून २५ हजार रुपये आणले. मध्यवर्ती बसस्थानकावर उतरल्यानंतर ते रोकड घेऊन रुग्णालयात जात असताना चंद्रशेखर नितोने याने त्यांना तुमची रोकड लुटण्याची भीती आहे. मी पोलीस असून, सदरची रक्कम माझ्याकडे द्या, अशी विनंती केली. यावरून शेख नौशाद यांनी त्याच्यावर विश्वास ठेवून रक्कम त्याच्या हातात दिली. तेवढय़ात नितोने हा त्यांना गुंगारा देऊन पसार झाला. या प्रकरणी शेख नौशाद यांच्या तक्रारीवरून रामदासपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल के ला. त्यानंतर आरोपीचा शोध सुरू केला असता रविवारी नितोने या आरोपीस अटक करण्यात आली असून, त्याला न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.