ज्येष्ठांच्या लसीकरणात को विन सॉफ्टवेअरच्या लॉगइनचा खोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2021 10:10 AM2021-03-03T10:10:53+5:302021-03-03T10:11:02+5:30

Corona Vaccination जिल्हाभरातील केंद्रांवरही हीच समस्या आल्याने लाभार्थींना दोन ते अडीच तास ताटकळत राहावे लागले.

Login of Co Win Software in Vaccination of Seniors | ज्येष्ठांच्या लसीकरणात को विन सॉफ्टवेअरच्या लॉगइनचा खोडा

ज्येष्ठांच्या लसीकरणात को विन सॉफ्टवेअरच्या लॉगइनचा खोडा

Next

अकोला : ज्येष्ठ नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्याच्या मोहिमेस सुरुवात झाली असून, ही लस घेण्यासाठी ज्येष्ठांमध्ये असलेल्या उत्साहात कोविन ॲपच्या सॉफ्टवेअरची गती अडथळा ठरत असल्याचे मंगळवारी येथील जिल्हा स्त्री रुग्णालयातील लसीकरण केंद्रात दिसून आले. लाभार्थींची नोंदणी करण्यासाठी लॉगइन होण्यात अडचण आल्याने सकाळी काही वेळ गोंधळ उडाला, परंतु सकाळी ११ वाजेनंतर ही समस्या निकाली निघाल्याने सायंकाळपर्यंत या केंद्रात १९८ ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. दरम्यान, जिल्हाभरातील केंद्रांवरही हीच समस्या आल्याने लाभार्थींना दोन ते अडीच तास ताटकळत राहावे लागले.

ज्येष्ठांसाठीच्या कोविड लसीकरण मोहिमेला सोमवारपासून जिल्ह्यातील नऊ केंद्रांवर सुरुवात झाली. यामध्ये महापालिका क्षेत्रातील जिल्हा स्त्री रुग्णालय आणि मनपाच्या सिंधी कॅम्प येथे, तर प्रत्येक तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयातील लसीकरण केंद्राचा समावेश आहे. पातूर येथे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. लसीकरणाच्या दुसऱ्या दिवशी जिल्हा स्त्री रुग्णालयातील दोन्ही केंद्रांवर ज्येष्ठ नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. सकाळी कोविन सॉफ्टवेअरमध्ये लॉगइनची अडचण येत असल्याने लसीकरणासाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिकांना काहीकाळ ताटकळत राहावे लागले. यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. १ मार्चपासून नवीन सॉफ्टवेअर आल्यामुळे ही तांत्रिक अडचण आल्याचे यावेळी सांगण्यात आले. तोपर्यंत ज्येष्ठ नागरिकांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली. सकाळी ११ वाजता लॉगइन झाल्यानंतर नोंदणीप्रक्रिया सुरळीत झाली. त्यानंतरही गती मंद असल्याने लसीकरणाची गतीही मंदावलेली दिसून आली.

 

जिल्हाभरात ६०४ लाभार्थींचे लसीकरण

जिल्ह्यातील नऊ लसीकरण केंद्रांमध्ये मंगळवारी ६्०४ ज्येष्ठ नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली. यामध्ये ६० वर्षांपेक्षा अधिक वयाचे ४०९ जण, ४५ ते ५९ वयोगटांतील सहव्याधीग्रस्त असलेले ३५ जण व इतर १६४ जणांचा समावेश आहे.

सकाळी दोन तास लॉगइनची समस्या उद्भवली होती. केवळ अकोलाच नव्हे तर संपूर्ण राज्यभरातच ही समस्या होती. त्यामुळे लसीकरणास थोडा विलंब झाला. दुपारनंतर मात्र कोणतीही समस्या जाणवली नाही, त्यामुळे वेगात लसीकरण झाले. लॉगइनच्या या समस्येबाबत राज्यपातळीवरील अधिकाऱ्यांना कळविण्यात आले आहे.

- डॉ. मनीष शर्मा, जिल्हा समन्वयक, कोविड लसीकरण मोहीम

Web Title: Login of Co Win Software in Vaccination of Seniors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.