लोकअदालतीत एक हजारावर तक्रारींमध्ये समेट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2019 12:42 PM2019-12-15T12:42:39+5:302019-12-15T12:44:27+5:30

समेट घडवून आणलेल्या प्रकरणांमध्ये दिवाणी, फौजदारी, मोटार वाहन अपघात, धनादेश अनादर प्रकरणाचा समावेश होता.

Lok Adalat resolves over one thousand complaints! | लोकअदालतीत एक हजारावर तक्रारींमध्ये समेट!

लोकअदालतीत एक हजारावर तक्रारींमध्ये समेट!

Next
ठळक मुद्दे६ हजार ९५० प्रकरणे राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती. यापैकी १ हजार ८९ प्रकरणात समेट घडवून आणण्यात आला. १० कोटी ८० लाख ४२ हजार ६३७ रुपये वसूल करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबईच्या निर्देशानुसार प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश वाय.जी. खोब्रागडे यांच्या मार्गदर्शनाखाली १४ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या लोकअदालतीमध्ये १ हजार ८९ प्रकरणाच्या तक्रारींवर समेट घडवून आणण्यात आला. या प्रकरणांचा निपटारा करताना, १० कोटी ८० हजार, ४२ हजार ६३७ रुपयांची विक्रमी वसुली करण्यात आली.
जिल्ह्यातील सर्व दिवाणी व फौजदारी, कामगार न्यायालय, सहकार न्यायालय, कौटुंबिक न्यायालय, औद्योगिक न्यायालय येथे १४ डिसेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. न्यायालयात प्रलंबित प्रकरणांपैकी एकूण ६ हजार ९५० प्रकरणे राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती. यापैकी १ हजार ८९ प्रकरणात समेट घडवून आणण्यात आला. समेट घडवून आणलेल्या प्रकरणांमध्ये दिवाणी, फौजदारी, मोटार वाहन अपघात, धनादेश अनादर प्रकरणाचा समावेश होता. या १ हजार ८९ प्रकरणामध्ये १० कोटी ८० लाख ४२ हजार ६३७ रुपये वसूल करण्यात आले.
याकरिता सर्व पॅनलवर पॅनल सदस्य म्हणून न्यायाधीश, अधिवक्ता व समाजसेवक यांनी काम पाहिले. लोकअदालतीमध्ये जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष व प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश वाय.जी. खोब्रागडे, जिल्हा व सत्र न्यायाधीश एच. के. भालेराव यांचे मार्गदर्शन लाभले. लोकअदालतीच्या यशस्वीतेसाठी विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव व न्यायाधीश एस. एस. बोस, जिल्हा न्यायालयाचे प्रबंधक ए.एस. लव्हाळे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अधीक्षक सज्जाद अहमद, श्रीहरी टाकळीकर, वरिष्ठ लिपिक, व्ही.आर. पोहरे, कुणाल पांडे, कनिष्ठ लिपिक व मो. शरीफ, शाहबाज खान आदींनी प्रयत्न केले. (प्रतिनिधी)

 

Web Title: Lok Adalat resolves over one thousand complaints!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.