Lok Sabha Election 2019 : निवडणूक प्रचारातून शेतकऱ्यांच्या समस्या गायब!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2019 12:52 PM2019-04-07T12:52:06+5:302019-04-07T12:53:10+5:30
अकोला: अकोला लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक प्रचारात शेतकऱ्यांच्या मुद्यांवर राजकीय पक्षांकडून कानाडोळा करण्यात येत असल्याने निवडणूक प्रचारातून शेतकऱ्यांच्या समस्या गायब झाल्याचे वास्तव आहे.
अकोला: अकोला लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक प्रचारात शेतकऱ्यांच्या मुद्यांवर राजकीय पक्षांकडून कानाडोळा करण्यात येत असल्याने निवडणूक प्रचारातून शेतकऱ्यांच्या समस्या गायब झाल्याचे वास्तव आहे.
अकोला लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी १८ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीच्या जाहीर प्रचारात अद्यापही जोर नसला, तरी निवडणूक रिंगणातील उमेदवारांकडून मतदारसंघातील मतदारांशी संवाद साधत बैठका घेण्यात येत आहेत. जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीत शेतकरी संकटात सापडला असताना, शेतकºयांच्या विविध समस्यांच्या विषयांवर मात्र कोणीही बोलत नाही. कर्जमाफी, दुष्काळी मदत, शेतकरी सन्मान निधी योजना, तूर खरेदीचे थकीत चुकारे यासह शेतकºयांच्या इतर प्रश्नांवर राजकीय पक्षांकडून कानाडोळा करण्यात येत आहे. निवडणुकीच्या प्रचारात शेतकºयांच्या प्रश्नांवर चर्चा होत नसल्याने, लोकसभा निवडणुकीच्या प्रचारातून शेतकºयांच्या समस्यांचा मुद्दा गायब झाल्याचे चित्र आहे.
शेतकºयांच्या अशा आहेत समस्या!
कर्जमाफी योजनेत कर्जमाफीसाठी जिल्ह्यातील १ लाख ३८ हजार ७३२ शेतकºयांनी आॅनलाइन अर्ज केले होते. त्यापैकी १ लाख ३१ हजार ३१० शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळाला असला, तरी उर्वरित शेतकरी अद्याप कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत. दुष्काळग्रस्त सर्व शेतकºयांना मदतीच्या पूर्ण रकमेचा लाभ अद्याप मिळाला नाही. पीएम-किसान सन्मान निधी योजनेंतर्गत अर्ज केलेल्या जिल्ह्यातील सर्व शेतकºयांच्या खात्यात पहिल्या हप्त्याची रक्कम जमा झाली नाही. हमी दराने विकलेल्या तुरीचे चुकारे वेळेवर मिळत नाही. अशा अनेक समस्यांनी शेतकरी अडचणीत सापडला असताना, निवडणूक प्रचारात मात्र शेतकºयांच्या विविध प्रश्नांवर चर्चा होत नाही.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात शेतकरी समस्यांच्या विषयावर कोणतीही चर्चा होत नाही. शेतकºयांच्या प्रश्नावर कोणताही राजकीय पक्ष बोलत नाही. त्यामुळे निवडणूक प्रचारात शेतकºयांच्या समस्यांचा विषय गायब झाल्याची परिस्थिती आहे.
- शिवाजी भरणे,
शेतकरी, रामगाव, ता. अकोला.