Lok Sabha Election 2019: अकोल्यात ठरणार शेतकरी संघटनेची राजकीय भूमिका!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 01:52 PM2019-03-16T13:52:16+5:302019-03-16T13:52:45+5:30
अकोला: लोकसभेची निवडणूक शेती धोरणाच्या मुद्यांवर व्हावी, यासाठी शेतकरी संघटना प्रयत्नशील आहे. सर्व मतदारसंघांत शेतकऱ्यांच्या बाजूचे स्वतंत्रतावादी उमेदवार उभे राहावेत, ही शेतकरी संघटनेची अपेक्षा आहे.
अकोला: लोकसभेची निवडणूक शेती धोरणाच्या मुद्यांवर व्हावी, यासाठी शेतकरी संघटना प्रयत्नशील आहे. सर्व मतदारसंघांत शेतकऱ्यांच्या बाजूचे स्वतंत्रतावादी उमेदवार उभे राहावेत, ही शेतकरी संघटनेची अपेक्षा आहे. त्यामुळे यासंदर्भात संघटनेची राजकीय भूमिका ठरविण्यासाठी १९ मार्च रोजी अकोल्यात बैठक होत आहे. शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी या बैठकीसंदर्भात माहिती देताना येत्या लोकसभा निवडणुकीत रा. लो. आघाडी व सं. पु. आघाडी हे मुख्य पर्याय आहेत. इतर काही आघाड्या निवडणूक लढवतील; परंतु यापैकी एकही आघाडी समाजवादी व्यवस्था सोडून शेतकऱ्यांच्या हितासाठी खुल्या व्यवस्थेच्या बाजूने निर्णय घेण्याची शक्यता नाही, असे स्पष्ट केले आहे. शेतकऱ्यांना खरे स्वातंत्र्य देण्यासाठी स्वतंत्रतावादी विचाराच्या पक्षांचा पर्याय देणे गरजेचे आहे. जे उमेदवार शेतकºयांच्या स्वातंत्र्यासाठी व एकूणच देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी शेतकरी संघटनेने पुरस्कृत केलेला जाहीरनामा स्वीकारण्यास तयार असतील, त्यांना स्वतंत्र भारत पक्षातर्फे उमेदवारी देण्याचा निर्णय या बैठकीत होण्याची शक्यताही त्यांनी पत्रकात व्यक्त केली आहे.