Lok Sabha Election 2019 : निवडणूक खर्चात वंचित बहुजन आघाडी आघाडीवर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2019 12:45 PM2019-04-14T12:45:31+5:302019-04-14T12:45:37+5:30
निवडणूक खर्चानुसार वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अॅड. प्रकाश आंबेडकर यांचा निवडणूक खर्च सर्वाधिक असून, दुसºया क्रमांकावर भाजपा उमेदवार अॅड. संजय धोत्रे आणि तिसºया क्रमांकावर काँग्रेस उमेदवार हिदायत पटेल यांचा निवडणूक खर्च आहे.
अकोला: अकोला लोकसभा मतदारसंघातील निवडणूक रिंगणात उतरलेल्या ११ उमेदवारांकडून जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाकडे १३ एप्रिलपर्यंत सादर करण्यात आलेल्या निवडणूक खर्चानुसार वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अॅड. प्रकाश आंबेडकर यांचा निवडणूक खर्च सर्वाधिक असून, दुसºया क्रमांकावर भाजपा उमेदवार अॅड. संजय धोत्रे आणि तिसºया क्रमांकावर काँग्रेस उमेदवार हिदायत पटेल यांचा निवडणूक खर्च आहे. त्यामुळे निवडणुकीचा खर्च करण्यात वंचित बहुजन आघाडी सध्या आघाडीवर असल्याचे वास्तव आहे.
अकोला लोकसभा मतदारसंघात ११ उमेदवार निवडणूक लढवित आहेत. त्यामध्ये भाजपाचे अॅड. संजय धोत्रे, काँग्रेसचे हिदायत पटेल, वंचित बहुजन आघाडीचे अॅड. प्रकाश उपाख्य बाळासाहेब आंबेडकर, बसपाचे बी. सी. कांबळे, पीपल्स पार्टी आॅफ इंडिया (डेमोक्रेटिक)चे अरुण वानखडे, बहुजन मुक्ती पार्टीच्या प्रवीणा भटकर, अपक्ष गजानन हरणे, अपक्ष अरुण ठाकरे, अपक्ष प्रवीण कौरपुरीया, अपक्ष मुरलीधर पवार व अपक्ष सचिन शर्मा इत्यादी उमेदवारांचा समावेश आहे. निवडणूक रिंगणातील उमेदवारांकडून जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या खर्चविषयक कक्षाकडे १३ एप्रिलपर्यंत सादर करण्यात आलेल्या निवडणूक खर्चानुसार निवडणूक रिंगणातील उमेदवारांच्या खर्चाच्या तुलनेत सर्वाधिक निवडणूक खर्च वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अॅड. प्रकाश उपाख्य बाळासाहेब आंबेडकर यांचा आहे. ८ एप्रिलपर्यंत अॅड. आंबेडकर यांचा निवडणूक खर्च ३२ लाख १६ हजार १६८ रुपये असून, दुसºया क्रमांकावर भाजपाचे उमेदवार अॅड. संजय धोत्रे यांचा ९ एप्रिलपर्यंत १७ लाख ५८ हजार ६६५ रुपये निवडणूक खर्च आहे, तर तिसºया क्रमांकावर काँग्रेसचे उमेदवार हिदायत पटेल यांचा ९ एप्रिलपर्यंत ३ लाख ५८ हजार ७४० रुपये निवडणूक खर्च आहे.
अकोला लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक रिंगणातील उमेदवारांनी आतापर्यंत केलेला खर्च बघता, त्यामध्ये निवडणूक खर्च करण्यात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आघाडीवर असल्याचे दिसत आहे.
उमेदवारांचा असा निवडणूक खर्च!
उमेदवार पक्ष रक्कम
अॅड. प्रकाश आंबेडकर वंबआ ३२१६१६८
अॅड. संजय धोत्रे भाजपा १७५८६६५
हिदायत पटेल काँग्रेस ३५८७४०
बी. सी. कांबळे बसपा ५८८८६
अरुण वानखडे पीपाइं ८४३७५
प्रवीणा भटकर बमुपा ९१८३६
गजानन हरणे अपक्ष २७०००
मुरलीधर पवार अपक्ष २८१९२
अरुण ठाकरे अपक्ष २०२९५
प्रवीण कौरपुरीया अपक्ष ३०८८७
सचिन शर्मा अपक्ष ४१२८६
निवडणूक निरीक्षक सोमवारी घेणार आढावा!
अकोला लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निरीक्षक (खर्च) नागेंद्र यादव सोमवार, १५ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात उमेदवारांच्या निवडणूकविषयक खर्चाचा आढावा घेणार आहेत, असे उपजिल्हाधिकारी तथा खर्चविषयक नोडल अधिकारी अनिल खंडागळे यांनी सांगितले.