मी जागरूक मतदार म्हणून अनेकांनी काढला सेल्फी
By नितिन गव्हाळे | Published: April 26, 2024 03:36 PM2024-04-26T15:36:10+5:302024-04-26T15:37:40+5:30
Lok sabha election 2024 : महानगरपालिकेच्या वतीने अकोला शहरातील मतदार केंद्रांवर सेल्फी पॉईंट तयार करण्यात आले आहेत. तसेच मतदान केंद्रांची आकर्षक सजावट देखील करण्यात आली आहे.
अकोला-मतदानाची टक्केवारी वाढावी आणि लोकशाही बळकट व्हावी या उद्देशाने अकोला महानगरपालिकेच्या अंतर्गत अनेक आदर्श मतदान केंद्रांवर सेल्फी पॉईंट तयार करण्यात आले आहेत. या सेल्फी पॉइंट वरती मतदान केल्यानंतर अनेक मतदार मी जागरूक मतदार म्हणून सेल्फी घेत किंवा फोटो काढून इतरांचा सुद्धा उत्साह वाढवत असल्याचे दिसून येत आहे.
जिल्हा प्रशासन तथा महानगरपालिकेच्या वतीने अकोला शहरातील मतदार केंद्रांवर सेल्फी पॉईंट तयार करण्यात आले आहेत. तसेच मतदान केंद्रांची आकर्षक सजावट देखील करण्यात आली आहे. मतदान केल्यानंतर अनेक जण मी जागरूक मतदार असल्याचे दाखवून देण्यासाठी दिलेल्या सेल्फी पॉइंट वरती फोटो काढत आहेत आणि हे फोटो सोशल मीडिया वरती व्हायरल करण्यासोबतच व्हाट्सअप वरती स्टेटस सुद्धा ठेवत असल्याचे दिसून येत आहे. एकंदरीतच मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी मतदार सुद्धा प्रयत्न करीत असल्याचे दिसून येत आहे. जिल्हा प्रशासन व महानगरपालिकेच्या प्रयत्नांना किती यश मिळते किती टक्के मतदान वाढते. हे रात्री स्पष्ट होईल.