लोकमान्य टिळक-नागपूर विशेष रेल्वे १५ सप्टेंबरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2019 14:48 IST2019-09-11T14:48:28+5:302019-09-11T14:48:33+5:30
लोकमान्य टिळक-नागपूर दरम्यान वनवे विशेष रेल्वेगाडी सोडली जाणार आहे.

लोकमान्य टिळक-नागपूर विशेष रेल्वे १५ सप्टेंबरला
अकोला : सणासुदीची गर्दी लक्षात घेत मध्य रेल्वेने लोकमान्य टिळक-नागपूर दरम्यान वनवे विशेष रेल्वेगाडी सोडली जाणार आहे. १५ सप्टेंबरपासून सोडल्या जाणाऱ्या रेल्वेगाडीचा प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाद्वारे करण्यात आले आहे.
लोकमान्य टिळक-नागपूर दरम्यान रेल्वेगाडी क्रमांक ०२०२१ डाऊन सुपर फास्ट विशेष साप्ताहिक रेल्वे रविवार, १५ सप्टेंबरपासून सोडली जाणार आहे. ही गाडी १५.५० ला प्रस्थान करीत सोमवारी सकाळी ६.३० मिनिटांनी नागपूर येथे पोहोचणार आहे. या गाडीला कल्याण, कसारा, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, अकोला, बडनेरा व वर्धा या स्थानकांवर थांबा आहे. या गाडीत १५ स्लीपर क्लास बोगी, दोन जनरल बोगी राहणार असून, १२ सप्टेंबरपासून या गाडीचे आरक्षण सुरू राहील. प्रवाशांनी या विशेष रेल्वेगाडीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.