लोकमतचा दणका...अखेर कोरोना संदिग्ध रुग्णास अकोला येथे हलविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2020 11:49 AM2020-05-13T11:49:20+5:302020-05-13T11:50:31+5:30
आरोग्य विभागाने गावात रुग्णवाहिका पाठवून संदिग्ध रुग्णास अकोला येथील शासकीय वैद्यकीय महविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात नेले.
- प्रशांत विखे
तेल्हारा : तालुक्यातील वरुड गावात एक कोरोना संदीग्ध रुग्ण गत तीन दिवसांपासून रुग्णवाहिकेअभावी उपचारापासून वंचित असल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये झळकताच खळबळून जागे झालेल्या आरोग्य विभागाने गावात रुग्णवाहिका पाठवून संदिग्ध रुग्णास अकोला येथील शासकीय वैद्यकीय महविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात नेले.
तालुक्यातील वरूड बिहाडे येथील बरेच नागरिक परराज्यातून गावामध्ये दाखल झाले आहेत. त्यापैकी एका ६० वर्षीय वृद्धाला ताप, सर्दी, खोकल्याची लक्षणे दिसून आले आहेत. घरातील इतर सदस्य घरात जात असल्यामुळे हा वृद्ध घरात पडून असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली व याबाबत प्रशासन व संबंधित डॉक्टरांना अवगत केले आहे; परंतु या वृद्धाला कोणीही शासकीय रुग्णालयात घेऊन जाण्यास तयार नाही. रुग्णाची लक्षणे लक्षात घेता रुग्णवाहिका उपलब्ध होत नसल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. रुग्णाची लक्षणे पाहता, त्यासाठी दुसरी रुग्णवाहिका आहे; परंतु ही रुग्णवाहिका जिल्'ाकरिता एकच असल्याने तिला येण्यास विलंब होत आहे. त्यामुळे रुग्ण घरातच पडून आहे. प्रशासनाने व गावातील सरपंच तसेच गावकरी यांनी बºयाचदा रुग्णवाहिकेसाठी प्रयत्न केले; परंतु अद्याप रुग्णवाहिका उपलब्ध झाली नसल्याने गावकरी यांनी चिंताग्रस्त झाले आहेत. दोन दिवसांपासून माहिती देऊन संबंधित आरोग्य विभागाचा कुठलाही डॉक्टर व आरोग्य सेवक गावात पोहोचला नाही; परंतु प्रशासनाला याबाबत माहिती मिळाली असता, एक रुग्ण वगळता परराज्यातून व बाहेरून आलेल्या व्यक्तींची मंगळवारी तपासणी करून ‘होम क्वारंटीन’ करण्याचा सल्ला देण्यात आला. याबाबत तहसीलदार राजेंद्र सुरडकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी रुग्णवाहिका व्यस्त आहेत. संदिग्ध रुग्णांसाठी एकच रुग्णवाहिका उपलब्ध असल्याने विलंब होत असल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत ‘लोकमत’ ने गुरुवारी रोजी वस्तुनिष्ठ वृत्त प्रकाशित करताच रुग्णवाहिका सदर रुग्णाला घेऊन अकोला येथिल शासकीय रुग्णालयात घेऊन गेली. आता सदर रुग्णाच्या अहवालाकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे