लोकमतचा दणका; खाबूगिरी करणाऱ्या वाहतूक पोलिसांचा शोध घेण्याचे निर्देश!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 12:18 PM2018-08-29T12:18:33+5:302018-08-29T12:46:38+5:30
खामगाव: वाहतूक पोलिसांच्या खाबुगिरीची लक्तरे ‘लोकमत’ने बुधवारी स्टिंग आॅपरेशनच्या माध्यमातून वेशीवर आणली. त्यामुळे जिल्हा पोलिस प्रशासनात खळबळ उडाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: वाहतूक पोलिसांच्या खाबुगिरीची लक्तरे ‘लोकमत’ने बुधवारी स्टिंग आॅपरेशनच्या माध्यमातून वेशीवर आणली. त्यामुळे जिल्हा पोलिस प्रशासनात खळबळ उडाली आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून, खाबुगिरी करणारे ते दोन वाहतूक पोलिस हुडकून काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहन धारकांकडून हप्ता वसुली करण्यात येत असल्याची वस्तुस्थिती ‘लोकमत’ने चव्हाट्यावर आणली. अतिशय धक्कादायक असलेल्या या गंभीर बाबीची दखल जिल्हा पोलिस अधिक्षकांसह, निवासी पोलिस अधीक्षकांनी घेतली असून, हप्ता वसुलीसाठी आलेल्या वाहतूक पोलिसांना हुडकून काढण्याचे आदेश त्यांनी संबंधितांना दिलेत. दरम्यान, बुधवारी पहाटेपासूनच ‘लोकमत’ने उघडकीस आणलेल्या स्टिंग आॅपरेशनची धूम सोशल मिडीयावर दिसून आली. पोलिस ग्रुपसोबतच इतर सामाजिक आणि माध्यमांच्या ग्रुपवर ‘लोकमत’च्या बातमीची चर्चा दिसून आली. या पार्श्वभूमीवर बुधवारी वाहतूक पोलिसांसह पोलिस प्रशासनामध्ये खळबळ उडाल्याचे दिसून आले.
वाहतूक पोलिसांचा माध्यमांवर दबाव!
वाहतूक पोलिसांच्या खाबुगिरीचा भंडाफोड मंगळवारी दुपारी ‘आॅनलाईन’ लोकमतवर झाला. याची माहिती समजताच ग्रामीण पोलिस स्टेशनशी संबधीत असलेल्या दोन वाहतूक पोलिसांनी माध्यमांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रकरण हाताबाहेर गेल्याचे निदर्शनास येताच, सुरूवातीला विनवणी केल्यानंतर ‘पाहून घेवू’ असा दमही या वाहतूक पोलिसांनी भरला.
वरिष्ठ अधिकाºयांकडून हालचाली!
दुचाकी स्वारकावर कारवाई न करण्यासाठी पैशांची मागणी करणाºया दोन वाहतूक पोलिसांना जिल्हा पोलिस अधिक्षकांनी शनिवारीच निलंबित केले आहे. त्याअुनषंगाने खाबुगिरी करणाºया दोन पोलिसांवर कारवाईचा पाश आवळल्याजाणार असल्याचे संकेत आहेत. त्यादृष्टीकोनातून पोलिस प्रशासनाने अंमलबजावणी सुरू केल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे.