दाम्पत्याला बेशुद्ध करून लुटले

By admin | Published: May 25, 2014 01:03 AM2014-05-25T01:03:39+5:302014-05-25T01:04:24+5:30

मध्य प्रदेशातील दाम्पत्याला अज्ञात चोरट्यांनी बेशुद्ध करून लुटल्याची घटना शनिवारी दुपारी अडगाव रेल्वे स्टेशनवर घडली.

Looted the couple by unconscious | दाम्पत्याला बेशुद्ध करून लुटले

दाम्पत्याला बेशुद्ध करून लुटले

Next

अकोला: मध्य प्रदेशातील दाम्पत्याला अज्ञात चोरट्यांनी बेशुद्ध करून लुटल्याची घटना शनिवारी दुपारी अडगाव रेल्वे स्टेशनवर घडली. मध्य प्रदेशातील जबलपूर येथे राहणारे कमलेशकुमारी व तिचा पती अशोक प्रजापती हे अकोला येथून रेल्वेने इंदूर येथे जात असताना, त्यांना अडगाव रेल्वे स्टेशनवर अज्ञात चोरट्यांनी बेशुद्ध केले आणि पत्नी कमलेशकुमारी यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने लंपास केले. दोघे पती-पत्नी अडगाव रेल्वे स्टेशनवर बेशुद्ध अवस्थेत पडून असल्याचे काही प्रवाशांना दिसून आले. त्यांनी रेल्वे पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी अडगाव रेल्वे स्टेशन गाठून, दोघाही पती-पत्नीला ताब्यात घेतले. यावेळी दोघेही बेशुद्धच होते. दोघाही पती-पत्नीला पोलिसांनी सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. सर्वोपचार रुग्णालयात डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना खासगी रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी दोघांना शहरातील खासगी रुग्णालयात हलविले. नेमकी घटना कशी घडली, याचा खुलासा पती-पत्नी शुद्धीवर आल्यानंतरच होईल.

Web Title: Looted the couple by unconscious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.