पोलिस असल्याची बतावणी करून मुख्याध्यापिकेला लुटले

By admin | Published: May 19, 2014 07:17 PM2014-05-19T19:17:53+5:302014-05-19T20:53:50+5:30

पोलिस असल्याची बतावणी करून अकोला येथिल मुख्याध्यापिकेला १ लाख ३५ हजार रुपयांनी लुटले.

Looted the headmistress by pretending to be a policeman | पोलिस असल्याची बतावणी करून मुख्याध्यापिकेला लुटले

पोलिस असल्याची बतावणी करून मुख्याध्यापिकेला लुटले

Next

अकोला:   पोलिस असल्याची बतावणी दोघा जणांनी मुंगीलाल बाजोरिया विद्यालयातील मुख्याध्यापिकेला करून १ लाख ३५ हजार रुपयांनी लुटल्याची घटना सोमवारी सकाळी ९.३0 वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी रामदासपेठ पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
रामदासपेठमध्ये राहणार्‍या वैशाली विजय खेर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्या मुंगीलाल बाजोरिया विद्यालयामध्ये मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. सोमवारी सकाळी त्या पती विजय खेर यांचा जेवणाचा डबा पोहोचवून देण्यासाठी टिळक पार्कसमोरील जनरल स्टोअर्समध्ये जात असताना, त्यांना टिळक पार्कजवळ दोन इसमांनी अडविले आणि आम्ही पोलिस असून, समोरच्या चौकामध्ये चोरी झाली आहे. वातावरण खराब आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या अंगावरील सर्व दागिने काढून पर्समध्ये ठेवा, असे सांगितले. त्यामुळे वैशाली खेर यांनी गळ्यातील १८ ग्रॅमचे सोन्याचे मंगळसूत्र, २५ ग्रॅमच्या सोन्याचे दोन बांगड्या, बोटातील ३ ग्रॅमची सोन्याची अंगठी असे दागिने काढून दिले. या तोतया पोलिसांनी त्यांच्याजवळील दागिने त्यांना एका कागदामध्ये बांधून दिले आणि जाण्यास सांगितले. वैशाली खेर या पतीच्या जनरल स्टोअर्सच्या दुकानामध्ये पोहोचल्यानंतर त्यांनी पर्समधील कागद काढला आणि उघडून पाहिला असता त्यामध्ये नकली बांगड्या असल्याचे त्यांना दिसल्यावर आपली फसवणून झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने रामदासपेठ पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार रामदासपेठ पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भादंवि कलम ४२0 नुसार गुन्हा दाखल केला. या दोन चोरट्यांजवळ काळ्या रंगाची मोटारसायकल होती, असे सांगून त्यांनी दोघाही चोरट्यांचे वर्णन पोलिसांना सांगितले.

Web Title: Looted the headmistress by pretending to be a policeman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.