शिवसेनेतर्फे जुने राम मंदिरात प्रभू रामचंद्रची महाआरती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2018 01:34 PM2018-11-25T13:34:45+5:302018-11-25T13:34:54+5:30
अकोला : अयोध्या येथे शरयू नदी किनारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी सायंकाळी ६ वाजता महाआरती केली. त्याचवेळी अकोल्यातील मोठे राम मंदिर येथे शिवसेनेतर्फे महाआरती करण्यात आली.
अकोला : अयोध्या येथे शरयू नदी किनारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी सायंकाळी ६ वाजता महाआरती केली. त्याचवेळी अकोल्यातील मोठे राम मंदिर येथे शिवसेनेतर्फे महाआरती करण्यात आली. यावेळी महिला आघाडी तसेच युवासेनेच्या शेकडो शिवसैनिकांनी उपस्थिती लावली होती.
महाआरती झाल्यानंतर आता पुढची महाआरती अयोध्या येथील श्रीराम लल्ला यांच्या नवीन मंदिरातच करण्यात येईल, अशी शपथ शिवसैनिकांनी घेतली. यावेळी महिला संपर्क संघटिका जोस्त्ना चोरे, जिल्हा महिला संघटिका देवश्री ठाकरे, शहर प्रमुख (अकोला पूर्व) अतुल पवनीकर, नगरसेविका मंजूषा शेळके, नगरसेवक गजानन चव्हाण, युवासेना जिल्हा अधिकारी विठ्ठल सरप, युवासेना शहर अधिकारी नितीन मिश्रा, शुभांगी किणगे, नीलिमा तिजारे, सुनीता श्रीवास, रेखा राऊत, वर्षा पिसोळे, राजेश्वरी शर्मा, अनिता मिश्रा, प्रमिला गीते, सरिता वाकोडे, उपशहर प्रमुख योगेश अग्रवाल, केदार खरे, अभिषेक खरसाडे, गजानन बोराळे, नम्रता धर्माळे, रेखा तिवारी, वर्षा पिसे, सीमा मोकळकर, संगीता मराठे, सागर भारुका, दिनेश सरोदे, सुरेंद्र विसपुते, पप्पू चौधरी, अनिल परचुरे, बंडूभाऊ सवई, अविनाश मोरे, प्रमोद धर्माळे, भूषण हागे, सुनील डुकरे, मोंटू पंजाबी, विलास मुंडोकार, उमेश श्रीवास्तव, निखिल ठाकूर, अक्षय वानखडे, आशिष पवार, अनिकेत काळे, भास्कर निंबोकार, कुणाल शिंदे, राजेश इंगळे, सतीश देशमुख, विनोद सोनकर, गोपाल बिल्लेवार, सागर कुकडे, प्रकाश वानखडे, संतोष रणपिसे, रूपेश ढोरे, चेतन थामेद, योगेश सावरकर यांच्यासह शहरातील उपशहर प्रमुख, विभाग प्रमुख, प्रभाग प्रमुख, शाखा प्रमुख यांच्यासह आजी-माजी पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.