शेती झाली तोट्याची; हमीभावही लागवडी खर्चापेक्षा कमी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:13 AM2021-07-02T04:13:50+5:302021-07-02T04:13:50+5:30

रवी दामोदर अकोला: निसर्गचक्र बदलल्यामुळे शेती करणे कठीण झाले आहे. अशातच यंदा कोरोनाचे संकट, पेट्रोल, डिझेलची दरवाढ, वाढलेली महागाई ...

Loss of farmland; Guaranteed price less than cultivation cost! | शेती झाली तोट्याची; हमीभावही लागवडी खर्चापेक्षा कमी!

शेती झाली तोट्याची; हमीभावही लागवडी खर्चापेक्षा कमी!

Next

रवी दामोदर

अकोला: निसर्गचक्र बदलल्यामुळे शेती करणे कठीण झाले आहे. अशातच यंदा कोरोनाचे संकट, पेट्रोल, डिझेलची दरवाढ, वाढलेली महागाई यामुळे लागवडीचा खर्च हा हजारोंनी वाढला, तर त्या तुलनेत हमीभाव मात्र केवळ ७० रुपयांनी वाढल्याने शेती तोट्याची झाली आहे. प्रति एकर लागवडीचा खर्च हा हमीभावापेक्षा जास्त असल्याने बळीराजा संकटात सापडला आहे.

केंद्र सरकारने खरीप हंगाम २०२१-२२ या वर्षासाठी हमीभाव जाहीर केले; केंद्र सरकारच्या शिफारशीनुसार प्रति क्विंटल २० ते ४५२ रुपयांची वाढ झाली. त्यामध्ये जिल्ह्यात प्रमुख पीक असलेल्या सोयाबीनच्या हमीभावात ७० रुपये, कपाशीमध्ये २०० ते २१० रुपये इतकी वाढ झाली आहे. दुसरीकडे वाढलेल्या महागाईमुळे लागवडी खर्चात भरमसाट वाढ झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा १००० ते १५०० रुपयांनी वाढ झाली आहे. निसर्गाचे चक्र बदलल्याने गतवर्षी अति पावसामुळे खरीप हंगामातील मूग, उडीद, सोयाबीन व कपाशी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यंदा बियाणांचे दर वाढले आहेत. सोयाबीनच्या बियाणांच्या एका बॅगची किंमत चार हजार रुपयांपर्यंत वाढली आहे. सरासरी विचार केल्यास एकरी एक बॅग बियाणे लागते. तसेच रासायनिक खतांचे वाढलेले भाव, गावरान खताच्या दरात वाढ झाली आहे. एवढा खर्च, परिश्रम घेऊनही निसर्गाचा समतोल बिघडल्याने पीक हाती येईल की नाही, याची शाश्वती नसल्याने बळीराजा हतबल झाला आहे.

पीक यंदाचा हमीभाव झालेली वाढ

मूग ७२७५ ७९

उडीद ६३०० ३००

सोयाबीन ३९५० ७०

कपाशी (मध्यम धागा) ५७२६ २११

कपाशी (लांबधागा) ६०२५ २००

तूर ६३०० ३००

ज्वारी (हायब्रीड) २७३८ ११८

--------------------------------

गतवर्षीच्या तुलनेत १० हजार रुपयांनी वाढला खर्च

गेल्या वर्षी कापूस, तूर आणि सोयाबीनचा पेरा हा जिल्ह्यात सर्वाधिक होता. या पिकासाठी शेतकऱ्याला प्रति एकर जवळपास ३० हजार रुपये येतो; मात्र यंदा ट्रॅक्टरद्वारे शेती महागली, बियाणांचे भाव वाढले आहेत. त्यामुळे यंदा खरीप हंगामात जवळपास १० हजार रुपयांनी वाढल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

-------------------------------

यंदा डिझेलचे दर वाढले, मजुरी महागली यामुळे लागवडी खर्चात भरमसाट वाढ झाली आहे. तसेच वेळेवर पाऊस येत नसल्याने उत्पादनात प्रचंड घट झाली आहे. शेती न परवडणारी झाली असून, सरकारने हमीभावात वाढ करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.

हेमंत नागे, शेतकरी, पाचपिंपळ.

Web Title: Loss of farmland; Guaranteed price less than cultivation cost!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.