ओवेसी बंधूंच्या विखारी प्रचारामुळे मुस्लिमांचे नुकसान

By admin | Published: February 16, 2017 10:02 PM2017-02-16T22:02:52+5:302017-02-16T22:02:52+5:30

राकाँचे खासदार माजीद मेमन यांचे पत्रकार परिषदेत टीकास्त्र

The loss of Muslims due to the spread of the Owaisi brothers | ओवेसी बंधूंच्या विखारी प्रचारामुळे मुस्लिमांचे नुकसान

ओवेसी बंधूंच्या विखारी प्रचारामुळे मुस्लिमांचे नुकसान

Next

अकोला, दि. १६- मुस्लीम समाजाला भेडसावणार्‍या प्रश्नांची उकल न करता जाहीर सभांमधून केवळ विखारी प्रचार करण्याचे काम एमआयएमच्या दोन्ही उच्चशिक्षित ओवेसी बंधूंनी सुरू केले आहे.ओवेसी बंधूंच्या कार्यशैलीमुळे मुस्लीम समाजाचे नुकसान होत असल्याचे टीकास्त्र राकाँचे खासदार अँड. माजीद मेमन यांनी सोडले. गुरुवारी मनपा निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
मुंबई महापालिका ताब्यात ठेवण्यासाठी शिवसेना व भाजपमध्ये वाक्युद्ध रंगले असून, कालपर्यंत गळ्य़ात गळे घालून सत्तेची फळे चाखणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उद्धव ठाकरे एकमेकांचे जाहीर सभांमधून वाभाडे काढत असल्याची टीका खा.अँड. माजीद मेमन यांनी केली. राज्यात सत्तास्थानी असलेल्या भाजप-शिवसेनेला सर्वसामान्य जनतेचा विसर पडला असून, कोण खरा व कोण खोटा, हे सिद्ध करण्याची जणू स्पर्धाच रंगली असल्याचे अँड. मेमन यावेळी म्हणाले. सत्ताधार्‍यांच्या भूमिकेमुळे सर्वसामान्य जनता संभ्रमात असून, ह्यअच्छे दिनह्णच्या वल्गना कधीच्याच हवेत विरल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळेच महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस विकासाच्या मुद्यांवरच निवडणूक लढवत असल्याचे अँड. मेमन यांनी स्पष्ट केले. ह्यट्रिपलह्ण तलाकच्या मुद्यावर केंद्र सरकारने मुस्लीम समाजातील महिलांच्या भावना समजून घ्याव्यात. महिलांवरील अत्याचार थांबले पाहिजेत, ही राष्ट्रवादीची भूमिका आहे. मात्र त्यापूर्वी महिलांची मते विचारात घेऊन केंद्र सरकारने योग्य तो निर्णय घ्यावा, असेही अँड. मेमन यांनी सांगितले. महापालिकेच्या निवडणुकीत अकोल्यात राष्ट्रवादीला यशापासून कोणी रोखू शकणार नाही. सुज्ञ जनतेने राष्ट्रवादीला प्राधान्य देण्याची गरज असल्याचे खा.अँड. माजीद मेमन यांनी सांगितले.

सरकार कोसळण्याच्या स्थितीत

राज्यातील युती सरकार अस्थिर झाले असून, ते कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता आहे. शिवसेनेने पाठिंबा काढला किंवा नाही, आम्ही मात्र भाजपसोबत जाण्याचा प्रश्नच निर्माण होत नसल्याचे खा. माजीद मेमन यांनी स्पष्ट केले.

डोक्यात टोपी, शेरवानी घालून मुस्लीम नेत्यांचा आव

हैदराबादमध्ये स्थापन केलेल्या एमआयएम पक्षाचे ओवेसी बंधू उच्चशिक्षित आहेत. विकासापासून वंचित असलेल्या मुस्लीम समाजाच्या समस्या केंद्र शासनाकडे कायदेशीररीत्या पाठपुरावा करून सोडवणे अपेक्षित असताना दोन्ही बंधू मुस्लिमांची माथी भडकावण्याचे काम करीत आहेत. डोक्यात टोपी व शेरवानी घालून मुस्लिमांचा नेता असण्याचा ते आव आणत असल्याची टीका खासदार माजीद मेमन यांनी केली.

Web Title: The loss of Muslims due to the spread of the Owaisi brothers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.