वन्यप्राण्यांमुळे संत्र्याचे नुकसान, शेतकरी हवालदिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:19 AM2021-04-01T04:19:17+5:302021-04-01T04:19:17+5:30
शिवपूर-बोर्डी या शिवारामधील संत्रा लागवडीच्या क्षेत्रात वन्यप्राणी विशेषतः हरणांनी तुफान धुमाकूळ घातलेला आहे. संत्रा लागवडीच्या क्षेत्रात वीण लावलेल्या कलमांचे ...
शिवपूर-बोर्डी या शिवारामधील संत्रा लागवडीच्या क्षेत्रात वन्यप्राणी विशेषतः हरणांनी तुफान धुमाकूळ घातलेला आहे. संत्रा लागवडीच्या क्षेत्रात वीण लावलेल्या कलमांचे हरणांनी प्रचंड प्रमाणात नुकसान केलेले आहे.या वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्यात शासनाचा वनविभाग कुचकामी ठरत आहे,शिवाय नुकसान भरपाई मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त आहेत. हरणांच्या टोळ्या शेतात ठाण मांडून राहत असल्याने पिकांचे रक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांना दिवसभर शेतातच बसून राहावे लागत आहे. अनेक शेतकरी रात्रीही शेतात जागल करताना आढळून येतात. वन्यप्राण्यांच्या उच्छादाबाबत शेतकऱ्यांनी शहानूर येथील वनपरिक्षेत्र अधिकारी यांना तक्रारी दिल्या आहेत.
तुटपुंजी आणि तात्पुरती मदत देण्याऐवजी, वन्यजीवांपासून रक्षण होईल अशी शेतकऱ्यांना कुंपण योजना दिल्या गेल्या पाहिजे.
कृषी क्षेत्राला सेवा देण्याऐवजी परिवर्तनाची आज गरज निर्माण झालेली आहे.
-शिरीष तराळे, संत्रा उत्पादक शेतकरी
जिवापाड मेहनत घेऊनही, पिकाची अशी हानी होत असेल, यापेक्षा दुसरे दुर्दैव कोणते. अवकाळी पावसामुळे यावर्षी संत्रा हवा त्या प्रमाणात बहरला नाही. त्यामुळे संत्रा उत्पादक आधीच विवंचनेत आहे.
-विनोद बनसोड, संत्रा उत्पादक शेतकरी