पंदेकृविचे ३0 टक्क्यांच्यावर नुकसान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2017 01:24 AM2017-09-06T01:24:27+5:302017-09-06T01:24:46+5:30

समान काम, समान वेतन मागणीसाठी डॉ. पंजाबराव  देशमुख कृषी विद्यापीठाच्या रोजंदारी मजुरांनी मागील २३ दिवसां पासून काम बंद आंदोलन सुरू  केल्याने कृषी विद्यापीठाच्या हजारो हे क्टरवरील पिके प्रभावित झाली असून, जवळपास ३0 ते ३५ टक्के उत् पादनावर प्रतिकूल परिणाम झाला आहे.

Loss of pandemic by 30%! | पंदेकृविचे ३0 टक्क्यांच्यावर नुकसान!

पंदेकृविचे ३0 टक्क्यांच्यावर नुकसान!

Next
ठळक मुद्देमजुरांच्या संपाचा परिणामखरीप पिके हातची गेली!

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : समान काम, समान वेतन मागणीसाठी डॉ. पंजाबराव  देशमुख कृषी विद्यापीठाच्या रोजंदारी मजुरांनी मागील २३ दिवसां पासून काम बंद आंदोलन सुरू  केल्याने कृषी विद्यापीठाच्या हजारो हे क्टरवरील पिके प्रभावित झाली असून, जवळपास ३0 ते ३५ टक्के उत् पादनावर प्रतिकूल परिणाम झाला आहे.
 ‘समान काम, समान वेतन’ लागू करू न थकबाकी देण्यात यावी, या  मागणीसाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या सर्वच  रोजंदारी मजुरांनी मागील २३ दिवसांपासून काम बंद आंदोलन  पुकारल्याने कृषी विद्यापीठाचे हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान  होत आहे. मध्यवर्ती संशोधन केंद्राच्या प्रक्षेत्रावरील मुगाचे पीक  वाळले होते. कृषी विद्यापीठाच्या सर्वच क्षेत्रावर रात्रीची गुरे सर्रास  सोडली जात असल्याने उभे पीक गुरांनी फस्त केले आहे. मूग  काढण्यासाठी  मजूरच नसल्याने मुगाच्या शेंगा गळून पडल्या असून,  या पिकाचे नुकसान झाले आहे.  इतरही संशोधनाची कामे प्रभावित  झाली आहेत. 
केंद्र सरकारने पारित केलेला कायदा १९७६ कलम ४ अन्वये तसेच  सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाप्रमाणे सर्व कृषी विद्यापीठात हे वेतन  दिले जात आहे. तथापि, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या  रोजंदारी मजुरांना समान वेतन देण्यास टाळाटाळ केली जात  असल्याचा आरोप करीत मजुरांनी काम बंद आंदोलन सुरू   केले  आहे. विद्यापीठाच्या बाराही विभागांतील रोजंदारी मजुरांचे कृषी विद्या पीठाच्या प्रशासकीय इमारतीसमोर हे आंदोलन सुरू  आहे. जोपर्यंत  मागण्या पूर्ण होणार नाहीत, तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार  नसल्याचा निर्धार संघटनेच्या नेत्यांनी केला आहे.
कृषी विद्यापीठाच्या मध्यवर्ती संशोधन केंद्राच्या प्रक्षेत्रावर यावर्षी मूग  बीजोत्पादनासाठीचा आहे. अनेक भागात हे पीक विरळ झाले आहे.  काही भागात मूग हिरवा आहे. त्यावर किडींचा प्रादुर्भाव झाला आहे.  देशी बीटी कापसावर फवारणी करण्यासाठी मजूर नसल्याने त्यावरही  प्रतिकूल परिणाम होत आहेत. 

Web Title: Loss of pandemic by 30%!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.