पिंजर परिसरात कमी दाबाचा वीजपुरवठा ; नागरिक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:15 AM2021-05-29T04:15:47+5:302021-05-29T04:15:47+5:30

पिंजर परिसरात कमी दाबाचा वीजपुरवठा होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. काही दिवसांपूर्वी कार्यकारी अभियंता विजयकुमार कासट, अधीक्षक अभियंता ...

Low pressure power supply in cage area; Citizens suffer | पिंजर परिसरात कमी दाबाचा वीजपुरवठा ; नागरिक त्रस्त

पिंजर परिसरात कमी दाबाचा वीजपुरवठा ; नागरिक त्रस्त

googlenewsNext

पिंजर परिसरात कमी दाबाचा वीजपुरवठा होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. काही दिवसांपूर्वी कार्यकारी अभियंता विजयकुमार कासट, अधीक्षक अभियंता पवनकुमार कछोट यांनी महावितरणकडून मान्सून पूर्व कामे पूर्ण करण्यात येईल, अशी ग्वाही दिली होती ; मात्र पिंजर येथे काही ठिकाणी कामे अपूर्ण असल्याने गावात कमी दाबाचा वीजपुरवठा होत आहे. तसेच परिसरातील वीजपुरवठा वारंवार खंडित होण्याचे प्रकार वाढले आहेत. याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

---------------

सध्या ३३ केव्ही. ब्रेक डाऊनमध्ये आहे. पिंजरला सप्लाय बार्शीटाकळी येथून दिला आहे. मेन्टनन्सची कामे लवकर पूर्ण करून वीजपुरवठा सुरळीत करण्यात येईल.

- मंगेश राणे, प्रभारी कनिष्ठ अभियंता, महावितरण.

----------------------------

पिंजर येथील वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. व्होल्टेज नसल्यामुळे घरातील उपकरणे बंद पडली आहेत. मेन्टनसची कामे न करण्यात आल्यामुळे लोकांना मनस्ताप होत आहे.

-अनिल आप्पा पेध्ये, ग्रामस्थ, पिंजर.

Web Title: Low pressure power supply in cage area; Citizens suffer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.