पिंजर परिसरात कमी दाबाने वीजपुरवठा; नागरिक हैराण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:19 AM2021-05-09T04:19:31+5:302021-05-09T04:19:31+5:30
परिसरात वीजपुरवठा वारंवार खंडित होण्याचे प्रकार वाढले आहेत. अशातच तांत्रिक अडचणी दूर करण्याच्या नावाखाली पिंजर परिसरात कमी दाबाचा वीजपुरवठा ...
परिसरात वीजपुरवठा वारंवार खंडित होण्याचे प्रकार वाढले आहेत. अशातच तांत्रिक अडचणी दूर करण्याच्या नावाखाली पिंजर परिसरात कमी दाबाचा वीजपुरवठा करण्यात येत आहे. सद्य:स्थितीत पिंजर परिसरात कमी दाबाने वीजपुरवठा मिळत असल्याने घरातील पंखे, टीव्ही आदी उपकरणे बंद पडली आहेत. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. परिसरात दि.६, ७ व ८ मे रोजी कमी दाबाचा वीजपुरवठा होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत.
--------------------
तांत्रिक काम सुरू असल्याने वीजपुरवठा खंडित करावा लागतो. परिसरात वीजपुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
-देवीदास जाधव, मुख्य लाइनमन पिंजर
------------------------
पिंजर येथे अनेक दिवसांपासून कमी दाबाने वीजपुरवठा सुरू आहे. तसेच वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढले आहेत. याकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी होत आहे.
- नानाराव महल्ले पाटील, वीज ग्राहक, पिंजर.