CoronaVirus : विदर्भात सर्वात कमी ॲक्टिव्ह रुग्ण वाशिमा जिल्ह्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2020 10:53 AM2020-11-28T10:53:58+5:302020-11-28T10:57:26+5:30
CoronaVirus News अकोला, बुलडाणा आणि अमरावती जिल्ह्यातही ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या पुन्हा वाढते आहे.
अकोला: दिवाळीनंतर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जात असताना विदर्भातील ॲक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे; मात्र वाशिम जिल्ह्यातील ॲक्टिव्ह रुग्णांचा दर विदर्भात सर्वात कमी असल्याचे दिसून येत आहे. विदर्भात पहिल्यांदाच कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर नागपूरसह अकोला आणि बुलडाणा हे जिल्हे कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले होते. त्यानंतर अमरावती, यवतमाळ, वाशिम या जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्यावाढीचा आलेख उंचावत गेला होता. मध्यंतरी विदर्भातील रुग्णसंख्यावाढीचा दर कमी झाला होता; मात्र दिवाळीनंतर बरे होणाऱ्या रुग्णांच्या तुलनेत ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या वाढू लागली. नागपूरसोबतच भंडारा, चंद्रपूर, गोंदिया या जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले आहे, तर पश्चिम विदर्भात अकोला, बुलडाणा आणि अमरावती जिल्ह्यातही ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या पुन्हा वाढते आहे. वाढती रुग्णसंख्या चिंता वाढवणारी असून, नागरिकांनी आवश्यक खबरदारी घेण्याची गरज आहे.
विदर्भात १२,४२० ॲक्टिव्ह रुग्ण
विदर्भात सद्यस्थितीत कोरोनाचे १२,४२० ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये सर्वाधिक ३,८३९ रुग्ण नागपूर जिल्ह्यात आहेत; मात्र एकूण रुग्णांचा विचार केल्यास भंडारा जिल्ह्यात ॲक्टिव्ह रुग्णांचा सर्वाधिक १०.०९ टक्के दर आहे.
अशी आहे विदर्भाची स्थिती
जिल्हा - पॉझिटिव्ह रुग्ण - ॲक्टिव्ह रुग्ण
अकोला - ९,२७७ - ६३५
अमरावती - १८,२६१ - १,०२२
भंडारा - १०,८१९ - १,०९२
बुलडाणा - ११,९२९ - ८५०
चंद्रपूर - १९,५४७ - १,७८०
गडचिरोली - ७,१९६ - ७११
गोंदिया - १२,११३ - १,०९५
नागपूर - १,१२,३५० - ३,८३९
वर्धा - ७,९९९ - ७६२
वाशिम - ६,०५४ - ८६
यवतमाळ - ११,९५३ - ५४८