रोहयो कामांवर दहा जिल्ह्यांमध्ये सर्वात कमी मजूर

By admin | Published: October 9, 2015 01:59 AM2015-10-09T01:59:27+5:302015-10-09T01:59:27+5:30

दहा जिल्ह्यांमधील कामांवर मजुरांची संख्या सर्वाधिक

The lowest labor force in ten districts on Roho works | रोहयो कामांवर दहा जिल्ह्यांमध्ये सर्वात कमी मजूर

रोहयो कामांवर दहा जिल्ह्यांमध्ये सर्वात कमी मजूर

Next

संतोष येलकर/अकोला: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत मागील आठवड्याच्या तुलनेत चालू आठवड्यात राज्यातील ३४ जिल्ह्यातील कामे आणि कामांवरील मजुरांची उपस्थिती बघता, चालू आठवड्यात दहा जिल्ह्यांमध्ये रोहयो कामांवर सर्वाधिक मजूर उपस्थिती असून, दहा जिल्ह्यांमधील कामांवर मजुरांची उपस्थिती सर्वात कमी असल्याचे आढळून आले. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत राज्यातील ३४ जिल्ह्यांमध्ये सद्यस्थितीत एकूण १३ हजार ३१७ कामे सुरू असून, या कामांवर १ लाख २ हजार ७२९ मजूर काम करीत आहेत. ३ ऑक्टोबर रोजी संपलेल्या आठवड्यात मागील आठवड्याच्या तुलनेत चालू आठवड्यात राज्यातील दहा जिल्ह्यांमध्ये इतर जिल्ह्यांच्या तुलनेत बीड, अमरावती, उस्मानाबाद, नागपूर, लातूर, परभणी, जळगाव, सांगली, नांदेड व अहमदनगर या दहा जिल्ह्यांमध्ये ३ ऑक्टोबर अखेरपर्यंत रोहयो कामांवर सर्वात जास्त मजूर उपस्थिती आहेत. कोल्हापूर, रायगड, ठाणे, रत्नागिरी, पालघर, अकोला, सिंधुदुर्ग, चंद्रपूर, सोलापूर व औरंगाबाद या दहा जिल्ह्यांमध्ये रोहयो कामांवर सरासरी सर्वात कमी मजुरांची उपस्थिती असल्याची बाब नियोजन व रोहयो विभागाच्या साप्ताहिक अहवालात समोर आली आहे. रोहयो कामांवर सर्वात कमी मजूर उपस्थितीचे जिल्हे जिल्हा मजूर उपस्थिती कोल्हापूर १0६ रायगड १३७ ठाणे ३१४ रत्नागिरी ७३७ पालघर ७५३ अकोला ७७९ सिंधुदुर्ग ८३५ चंद्रपूर १0१७ सोलापूर १११५ औरंगाबाद ११५१ रोहयो कामांवर सर्वात जास्त उपस्थितीचे जिल्हे जिल्हा मजूर उपस्थिती बीड १७0२३ अमरावती ९८९९ उस्मानाबाद ९३९२ नागपूर ५६४९ लातूर ५५८२ परभणी ५२२७ जळगाव ५१0६ सांगली ३७९२ नांदेड ३७0१ अहमदनगर ३२५३ एक हजारावर मजूर उपस्थितीत घट! ३ ऑक्टोबर रोजी संपलेल्या आठवड्यात मागील आठवड्याच्या तुलनेत रोहयो अंतर्गत राज्यातील रोहयो कामांवर १ हजार २१६ मजुरांची घट झाली आहे. त्यामध्ये सर्वात जास्त घट धुळे जिल्ह्यात ४ हजार १९५, सांगली जिल्ह्यात १ हजार ५९0, वर्धा जिल्ह्यात १ हजार ४६0, जालना जिल्ह्यात ८३४ व गडचिरोली जिल्ह्यात ७१0 मजूर उपस्थितीत घट झाल्याचा समावेश आहे.

Web Title: The lowest labor force in ten districts on Roho works

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.