एलटीटी-नागपूर समर स्पेशल शनिवारी, रेल्वेची विशेष फेरी चालवण्याचा निर्णय
By Atul.jaiswal | Published: June 11, 2023 12:53 PM2023-06-11T12:53:40+5:302023-06-11T12:57:40+5:30
या फेरीला अकोला रेल्वेस्थानकावरही थांबा असणार आहे.
अकोला : शाळांना असलेली उन्हाळ्याची व लग्नसराईच्या हंगामामुळे वाढलेली गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेन लोकमान्य टिळक टर्मिनन्स (मुंबई) ते नागपूर दरम्यान येत्या शनिवारी (१७ जून) उन्हाळी विशेष रेल्वेची एक फेरी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या फेरीला अकोला रेल्वेस्थानकावरही थांबा असणार आहे.
मध्य रेल्वेच्या भूसावळ विभाग प्रबंधक कार्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, गाडी क्र. ०२१३९ एलटीटी-नागपूर एक्स्प्रेस शनिवार, १७ जून रोजी एलटीटी स्थानकावरून ००.५० वाजता (शुक्रवारची मध्यरात्र) रवाना होऊन शनिवारी सकाळी १०:२७ वाजता अकोला स्थानकावर येईल. तीन मिनिटांचा थांबा घेऊन ही गाडी १०:३० वाजता अकोल्याहून रवाना होऊन दुपारी १५:३२ वाजता नागपूर स्थानकावर पोहोचणार आहे. या गाडीला भूसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला मुर्तीजापूर, बडनेरा, धामनगाव, वर्धा या स्थानकांवर थांबा असणार आहे.