कामकाज बाजूला ठेवून भूमिअभिलेख कार्यालयात रंगतो ‘लुडोचा गेम’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2020 10:26 AM2020-07-17T10:26:07+5:302020-07-17T10:26:44+5:30

कार्यालयातील कर्मचारी कार्यालयीन कामकाज बाजूला ठेवून रोज ‘लुडो’ खेळताना आढळून येत आहेत.

'Ludo game' in the land records office at Murtijapur | कामकाज बाजूला ठेवून भूमिअभिलेख कार्यालयात रंगतो ‘लुडोचा गेम’

कामकाज बाजूला ठेवून भूमिअभिलेख कार्यालयात रंगतो ‘लुडोचा गेम’

Next

- संजय उमक 
लोकमत न्यूज नेटवर्क
मूर्तिजापूर : येथील उपअधीक्षक भूमिअभिलेख कार्यालयात नागरिकांची कामे मागे ठेवून कार्यालयातील कर्मचारी कार्यालयीन कामकाज बाजूला ठेवून रोज ‘लुडो’ खेळताना आढळून येत आहेत.
कार्यालयात अधिकाऱ्यांचा कुठलाही वचक राहिला नसल्याने येथे कामासाठी येणाºया नागरिकांकडून येथील कर्मचारी अव्वाच्या सव्वा पैशाची मागणी करतात. त्यांनी मागितले तेवढे पैसे दिले नाहीत तर कर्मचारी कामचुकारपणा करीत असल्याचा आरोप तक्रारीत केला आहे. कार्यालयाचे उपअधीक्षक अटाळे हे जळगाव खा. येथून ये-जा करीत असल्याने, येथील कर्मचाºयाचे फावले आहे. याचाच फायदा घेत येथील कर्मचारी शिरस्तेदार भारत गवई, मुख्यालय सहायक उमेश पाथरकर व कार्यालयीन कामात आर्थिक व्यवहार करणारी एक व्यक्ती चक्क कार्यालयीन वेळेत मोबाइलवर ‘लुडो गेम’ खेळताना आढळून आले. शासकीय कामकाज बाजूला सारून दप्तरदिरंगाई करणाºया अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.


माझ्या उपस्थितीत मोबाइलवर लुडो खेळाचा प्रकार घडला नाही. माझ्या अनुपस्थितीत कर्मचारी असे वर्तन करीत असतील तर ही बाब गंभीर आहे. झालेल्या प्रकाराची चौकशी करून संबंधित कर्मचाºयांना समज देण्यात येईल.
- नितीन अटाळे, उपअधीक्षक, भूमिअभिलेख, मूर्तिजापूर

 

Web Title: 'Ludo game' in the land records office at Murtijapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.