पावसाळ्याच्या तोंडावर पुन्हा लम्पीचा प्रादुर्भाव; पळसो बढे व गाझीपूर येथे आढळली बाधित गुरे

By रवी दामोदर | Published: May 21, 2024 05:19 PM2024-05-21T17:19:36+5:302024-05-21T17:20:12+5:30

जनावरांच्या वाहतुकीस प्रतिबंध.

lumpy reoccurrence on the eve of monsoon affected cattle in palaso bade and ghazipur in akola | पावसाळ्याच्या तोंडावर पुन्हा लम्पीचा प्रादुर्भाव; पळसो बढे व गाझीपूर येथे आढळली बाधित गुरे

पावसाळ्याच्या तोंडावर पुन्हा लम्पीचा प्रादुर्भाव; पळसो बढे व गाझीपूर येथे आढळली बाधित गुरे

रवी दामोदर, अकोला : जिल्ह्यात ऐन पावसाळ्याच्या तोंडावर पुन्हा लम्पी आजाराचे बाधित गुरे आढळल्याने पशुपालकांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे.  अकोला तालुक्यातील पळसो बढे व मूर्तिजापूर तालुक्यातील गाझीपूर येथील गुरांमध्ये लम्पी त्वचारोगाची लागण झाल्याचे आढळले. पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाल्यानुसार संसर्ग केंद्रापासून १० किमी क्षेत्र बाधित घोषित करण्यात आले आहे. याबाबतचा आदेश जिल्हा दंडाधिकारी अजित कुंभार यांनी निर्गमित केला.

प्राण्यामधील संक्रमण व सांसर्गिक रोग प्रतिबंधक व नियंत्रण अधिनियमानुसार पळसो बढे व गाझीपूर येथील संसर्ग केंद्रापासून १० किमी बाधित क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. बाधित क्षेत्रातील जनावरांचे शेड निर्जंतुकीकरण करून परिसरात जनावरांची खरेदी व विक्री, वाहतूक, बाजार, जत्रा व प्रदर्शन आयोजित करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. त्याचप्रमाणे, ५ किमी परिघातील जनावरांना गोट पॉक्स लसीकरण तात्काळ करण्यात यावे, असे आदेश जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. जगदीश बुकतरे यांनी दिले आहेत.

Web Title: lumpy reoccurrence on the eve of monsoon affected cattle in palaso bade and ghazipur in akola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.