एम. आ. फर्निचर मॉलच्या होम फर्निचर एक्सपोला ग्राहकांचा जबरदस्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 06:11 AM2021-02-05T06:11:32+5:302021-02-05T06:11:32+5:30
एम.आर. फर्निचर मॉलने २६ जानेवारीचे औचित्य साधून आयोजित केलेल्या या प्रदर्शनात होम फर्निचरमध्ये ६५% पर्यंत सूददेखील देण्यात येत आहे. ...
एम.आर. फर्निचर मॉलने २६ जानेवारीचे औचित्य साधून आयोजित केलेल्या या प्रदर्शनात होम फर्निचरमध्ये ६५% पर्यंत सूददेखील देण्यात येत आहे. होम फर्निचरमध्ये सोफासेट, डायनिंग सेट, बेडरूम सेट, मॉड्युलर किचन, सेंटर टेबल, टीव्ही युनिट त्याचप्रमाणे ऑफिस, हॉस्पिटल, क्लिनिक, शाळा, महाविद्यालय ई.करिता लागणारे सर्व प्रकारचे फर्निचर त्यांच्या गरजेनुसार तयार करून देण्यात येते. त्याकरिता प्रथम बुकिंग करून ऑर्डर देणे आवश्यक आहे. उपरोक्त सर्वच प्रकारचे फर्निचर येथे ग्राहकांकरिता पाहण्यासाठी रेडिमेड (प्रात्यक्षिक स्वरूपात) परिस्थिती उपलब्ध आहे.
तसेच व्यावसायिकांकरिता एस. एस. तथा सी. आर. पॉवडर कोटेड मटेरियलयुक्त सुपर मार्केट, किराणा शॉप, भाजीपाला, फ्रूट शॉप, क्रॉकरी शोरूम, गिफ्ट आर्टिकल शोरूम, मेडिकल स्टोअर्स, साडी व ड्रेस मटेरियल शोरूम, रेडिमेड क्लॉथ शोरूम, मोबाइल गॅलरी शोरूम, इलेक्ट्रॉनिक्स शोरूम, इलेक्ट्रिकल शॉप, चप्पल जुते शोरूम, ज्वेलरी शोरूम, कॉस्मेटिक शॉपी, ॲग्रीकल्चर दुकानाला लागणारे फर्निचर आवश्यक त्या साईजमध्ये त्यांच्या डिझाईन अनुसार तयार करून जागेवर जाऊन फिटिंग करून देण्याची तयारी एम. आर. फर्निचर मॉलच्यावतीने स्वीकारण्यात आली आहे. अद्याप या प्रदर्शनाला दोन दिवस बाकी असून उपरोक्त गृहसजावटीकरिता लागणाऱ्या फर्निचरची गरज भासल्यास ग्राहकांना येथे बजाज फायनान्सच्या वतीने कमी व्याज दरात आसान मासिक किस्तीने कर्जसुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
अधिक माहितीकरिता इच्छुकांनी एम. आर. फर्निचर मॉल, एम.आय.डी.सी. फेज-४ प्लॉट नं. एम-७६, दर्गा रोड, कुंभारी रोड येथे संपर्क साधावा, असे आवाहन संचालक मनोज वोरा यांनी केले आहे.
फाेटो : १२ बाय १०
अकोला, वाशिम, बुलडाणा, अमरावती, यवतमाळ.