अयोध्येत बांधले जाणारे भव्य राममंदिर ऊर्जा केंद्र बनेल -चौहान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:16 AM2020-12-23T04:16:04+5:302020-12-23T04:16:04+5:30
१५ जानेवारीपासून गृहसंपर्क निधी संकलन अभियानाच्या निमित्ताने भागवत मंगल कार्यालयात ही बैठक झाली. बैठकीला तालुका संघचालक डॉ. माधव बनकर, ...
१५ जानेवारीपासून गृहसंपर्क निधी संकलन अभियानाच्या निमित्ताने भागवत मंगल कार्यालयात ही बैठक झाली. बैठकीला तालुका संघचालक डॉ. माधव बनकर, नगर संघचालक गजानन मुंजे, तालुका अभियान संयोजक अर्जुन वाघ, नगर संयोजक रवींद्र केला उपस्थित होते. निधी संकलन महत्त्वाची भूमिका पार पाडणाऱ्या ग्रामप्रमुखांना व वॉर्डप्रमुखांना रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे पत्र दिले जाईल. बैठकीचे प्रास्ताविक, परिचय प्रवीण उजाड, अमित काकड यांनी तर सांघिक अभियान गीताची संथा हरिदास चुंगडे, दीपक पुंडकर यांनी दिली. बैठकीला हिवरखेड, दानापूर, अडगाव, हिंगणी, मालठाणा, कार्ला, तळेगाव पातुर्डा, रायखेड, दहीगाव, वाडी अदमपूर, गाडेगाव, पाथर्डी, पंचगव्हाण, भांबेरी, थार, नर्सीपूर, तुदगाव, बेलखेड, वरुड वडनेर, घोडेगाव, इसापूर, तेल्हारा आदी गावातून कार्यकर्ते उपस्थित होते. पसायदानाने बैठकीची सांगता झाली.