अकाेल्यात महाआराेग्य शिबिरास प्रारंभ; देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2023 04:43 PM2023-10-07T16:43:02+5:302023-10-07T16:43:44+5:30
श्री राजराजेश्वर मंदिराला पर्यटनाचा दर्जा देणार
- राजरत्न सिरसाट
अकाेला : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी अकाेल्यात महाआरोग्य शिबिराचे उदघाटन केले. या शिबिरात सुमारे २५ हजारांपेक्षा अधिक रुग्णांची तपासणी करण्यात येणार आहे. तत्पूर्वी त्यांनी विस्तारीत शहीद स्मारकाचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी विविध घाेषणांसह अकाेल्याच्या श्री राजराजेश्वर मंदिराला पर्यटनाचा दर्जा देण्याची घाेषणा केली.
अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयात सात व आठ ऑक्टोबर असे दोन दिवसीय महाआरोग्य शिबिर आयोजनात आले असून या शिबिराच्या उद्घाटनासाठी उपमुख्यमंत्री फडणवीस व अलीकडेच नियुक्त पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे अकोल्यात आगमन झाले होते. अकोला विमानतळावर त्यांचे आगमन झाल्यावर पोलीस वाहनांचे लोकार्पण करण्यात आले, त्यानंतर १९५२ ते २०२३ पर्यंत प्राणाची आहुती देणारे, विरगती प्राप्त झालेले हुतात्मा यांच्या स्मारकाचे विस्तारित कामाचे लोकार्पण झाले.
सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलला ही त्यांनी भेट देऊन पाहणी केली. त्यांच्या समवेत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार रणधीर सावरकर, आमदार वसंत खंडेलवाल, आ.प्रकाश भारसाकळे, आ. हरीश पिंपळे, आ. वसंत खंडेलवाल, आ. अमोल मिटकरी,आ. राजेंद्र पाटणी, आ. लखन मलिक, माजी राज्यमंत्री डॉ.रणजीत पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष किशोर मांगटे पाटील, शहराध्यक्ष जयंत मसने, अनुप धोत्रे, अनुप शर्मा, जि.प.अध्यक्षा सगताताई अढाऊ, आरोग्य उप संचालक डॉ. तरणतूषार वारे, वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये, जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ. गाढवे, अमरावती महसूल आयुक्त श्रीमती निधी पांडे, जिल्हाधिकारी अजित कुंभार, मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. श्रीमती वैष्णवी, माजी आमदार बळीराम शिरसकार, सागर शेगोकार, देवाशिष काकड, माधव मानकर, संजय गोटफोडे आदी मंचावर उपस्थित होते. दरम्यान, नांदेड व नागपूर येथील आरोग्य बळींच्या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून आंदोलन होण्याच्या शक्यता लक्षात घेता शिवसेना अकोला जिल्हाप्रमुख गोपाल दातकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.