महाबीजच्या आमसभेत हलकल्लोळ!
By admin | Published: December 29, 2014 11:54 PM2014-12-29T23:54:43+5:302014-12-29T23:54:43+5:30
भागधारक शेतक-यांची भोजनाची अपुरी व्यवस्था, खुच्र्यांची फेकाफेक.
अकोला : महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या (महाबीज) आमसभेत भागधारक शेतकर्यांची भोजनाची अपुरी व्यवस्था झाल्याने एकच हलकल्लोळ उडाला. दूरवरू न आलेल्या भागधारकांना भोजन मिळाले नसल्याने आणि लाभांशाच्या मुद्दय़ावर संतप्त शेतकर्यांनी खुच्र्यांची फेकाफेक करू न नाराजी व्यक्त केली तसेच लोकप्रतिनिधी, महाबीज प्रशासनाच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी केली. महाबीजची ३७ वी आमसभा अकोला येथील मुख्यालयी २९ डिसेंबर रोजी घेण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी राज्याचे कृषी व पणन विभागाचे अप्पर मुख्य सचिव डॉ. सुधीरकुमार गोयल होते. व्यासपीठावर आमदार रणधीर सावरकर, महाबीजचे संचालक खासदार संजय धोत्रे, वल्लभराव देशमुख, महाबीजचे प्रभारी व्यवस्थापकीय संचालक ज्ञानेश्वर राजूरकर, महाबीजचे महाव्यवस्थापक (प्रक्रिया) डॉ. विनोद काळबांडे आदींची उपस्थिती होती. या सभेत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. तोपर्यंत सर्व शांत होते. भोजन अवकाशात मात्र भागधारक शेतकर्यांची भोजनाची पुरेपूर सोय न झाल्याने संतप्त शेतकर्यांनी महाबीज प्रशासनाविरोधात प्रचंड घोषणाबाजी करीत खुच्र्यांची फेकाफेक केली. यानंतर पुन्हा सभेला सुरुवात झाली तेव्हा संतप्त भागधारकांनी लाभांशाच्या मुद्दय़ावर प्रशासन व संचालक मंडळाला धारेवर धरले. प्रमोद गावंडे यांनी तर आमदार रणधीर सावरकर यांना व्यासपीठावरू न खाली उतरवण्यासाठी प्रचंड नारेबाजी केली. त्यामुळे महाबीज मुख्यालयात गोंधळ निर्माण झाला. सभेसाठी टाकण्यात आलेला शामियानाची ओढाताणही करण्यात आली. याबाबत आ. सावरकर यांची प्रतिक्रिया घेतली असता, ते म्हणाले की महाबीजचा भागधारक, बिजोत्पादक, शिवाय आमदार असल्याने मला व्यासपीठावर पाचारण करण्यात आले होते. तथापि एका शेतकर्याने याबाबत हरकत घेतली. लोकशाहीत सर्वांनाच बोलण्याचा अधिकार असल्याने मी व्यासपिठाच्या खाली उतरलो. पण, लगेच पुन्हा मला व्यासपिठावर बोलावण्यात आल्याचे आ. रणधीर सावरकर यांनी सांगीतले.